लोकल बातम्या

माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Nandgaon news

वेगवान मराठी मारुती जगधने

दिनांक 4 जानेवारी 20 26

  • नांदगाव मंडळ भाजपातर्फे राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
    नांदगाव : .नांदगाव येथील  अहिल्यादेवी होळकर उद्यान परिसरामध्ये माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी नांदगाव मंडळ भारतीय जनता पार्टीतर्फे राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. मुहूर्ताप्रमाणे दोन्ही महान विभूतींच्या जयंती एकाच दिवशी असल्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बालिका दिनानिमित्त काही बालिकांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमात बजरंग दल मातृशक्ती प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या सौ. अक्षदा कुलकर्णी, सचिव सौ. बबिता ताई तोरणे, शिवकन्या संगीता ताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
    याप्रसंगी उपस्थित माजी. जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा दिगंबर (सजन तात्या) कवडे, नांदगाव मंडळ भाजप उपाध्यक्ष सौ. ताराताई शर्मा, अक्षदा कुलकर्णी, संगीता सोनवणे, प्रदीप थोरात, भारत काकड , राजेंद्र गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाज, शिक्षण व राष्ट्रउभारणीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.
    कार्यक्रमास नांदगाव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या प्रसंगी भालूर मंडळ अध्यक्ष सौ. मनीषा ताई काकड, माजी. जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, नांदगाव मंडळ सरचिटणीस  सतीश शिंदे, सचिन पांडे, बबन मोरे, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बी. के. आहेर, संजय पटेल, दिनेश जेजुरकर, ॲड. मनीषाताई पाटील, गणेश शर्मा, मनोज शर्मा, शांताराम जाधव, सौ. बबिता तोरणे, सौ. मानसी जोशी, ॲड. अर्चनाताई , सौ. किरणताई बागोरे, अन्नपूर्णा जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!