नाशिक ग्रामीण

थेटाळे ता .निफाड शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक २ डिसेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील मौजे थेटाळे शिवारात आज दुपारी २.३० च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला.
याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी उगाव ता.निफाड येथील कु.अनिकेत गोरख पानगव्हाणे हा हिरो होंडा शाईन या बिना नंबरच्या मोटार सायकल वरून लासलगावकडून उगावकडे जात होता. यावेळी थेटाळे चौफुली नजीक त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक जोरात असल्याने डोक्यावरून चाक गेल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.उत्तम गोसावी करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!