बिबट्याच्या हाल्यात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईक मदत मिळावी – उदय सांगळे ,,,! बिबट्याला पकडा जनतेला वाचवा.. यासाठी ” प्रहार ” चे आज आंदोलन
बिबट्याला पकडा... जनतेला वाचवा ....

वेगवान नाशिक /भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. 11 सप्टेंबर 2025 — गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करून काना डोळा करत आहे.बिबट्याचा बिनधास्त वावर वाढला आहे. हिंमत वाढली असून दिवसाढवळ्या बिबट्यांचे हल्ले होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात संकटाला तोंड द्यावे लागते तालुक्यातील सर्वच भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहेत त्यामुळे जनता तणावाखाली वावरत आहेत.. या पार्श्वभूमीवर सिन्नरला उद्या सकाळी साडेअकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे तहसीलदार कचेरी समोर धरणे आंदोलन सिन्नर तालुक्यामध्ये तीन वर्षांमध्ये नियमित बिबट्याचे हल्ले व मृत्यूमुखी सरकारचा दुर्लक्ष ठोस उपयोजना नाही संबंधित मंत्री अधिकारी व तालुक्याचे व जिल्ह्याचे दुर्लक्षित करणारे लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या आंदोलन उद्या दिनांक 11 9 25 सकाळी साडेअकरा वाजता अशी माहिती तालुकाध्यक्ष कैलास दातीर व पदाधिकाऱ्यांनी दिल्या या आंदोलनासाठी कैलास दातीर पुष्पा भोसले संगीता आगळे विलास खैरनार चंद्रकांत डावरे प्रकाश थोरात गणेश थोरात सुनील वाघ सुनील जगताप गोपाळ गायकर दत्तात्रय लोंढे योगेश कांडळ अनिल गावंडे आशाताई गोसावी पंकज पठारे कामगार संघटना जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार यांनी ही माहिती दिली आहेत उद्या हे छोटा आंदोलन होणार आहे त्यानंतर पुढील आंदोलन मंत्रालय आझाद मंडळ उपोषण व क्रीडा मंत्र्याची गाडी नाशिक जिल्ह्यामध्ये अडवणार सरकारने लवकर लवकर दाखल घ्यावी लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर आपले डोळे उघडून न्याय द्यावा अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहेत.




