हवामान बिघडामुळे मका सोयाबीन लाल कांदा व कांदा रोपांचे नुकसान नैसर्गिक आपत्ती पुढे शेतकऱ्यांनी टेकले हात

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला :दिनांक: 30 ऑक्टोबर/ अतिवृष्टीमधून जे काही थोडंफार वाचलं होतं, त्याची देखील हवामान बिघाडमुळे व परतीच्या मुसळधार पावसाने पुरती वाट लावल्याने कांद्याचा झाला बांधा, मका पिकाची व मका चारा ची झाली माती अशी वाईट अवस्था येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अंदरसूल सायगाव पांजरवाडी, तळवाडे, कौटखेडे, गारखेडे, अंगुलगाव, रेंडाळे, भारम, रहाडी, अंगुलगाव, न्याहारखेडे, ममदापुर, बोकटे रस्ते सुरेगाव आदी परिसरातील गावातील शेतकऱ्यांची झाली आहे.
गेल्या दिवाळी पासून सलग दिवस व रात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उरले सुरले काढलेला मका भिजला. कांद्याची टाकलेली रोपे धोपटल्याने उतार कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मका पिक काही प्रमाणात अतिवृष्टीमधून वाचले होते. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मका सोंगणी साठी मजूराचा तुटवडा निर्माण झाला. सुरुवातीला सहा हजार रुपये मका सोंगणीचा एक एकर भाव होता, तो दिवाळी च्या तोंडावर बारा हजार रुपये एकर झाला. तरीही मका सोंगणीला मजूर मिळेना. त्यामुळे शेतकरी हैराण झाला. शेवटी मजूर मिळाले तरी पावसाने डाव साधून धो-धो बरसला आणि मोठ्या प्रमाणात शेतात उभा असलेला मका भिजला. भिजलेला मका व्यापारी मातीमोल भावात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
शासकीय हमीभाव 2हजार 400 रुपये असतांना खाजगी व्यापारी चांगल्या एक नंबर प्रतीचा मका 1200 ते 1700 रुपये भावाने खरेदी करत आहेत. मग यावर शासनाचा अंकुश कसा नाही? हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी का केली जाते आहे? याची शासकीय चौकशी होऊन कारवाई होणार का? की नुसतेच हे शेतकऱ्यांचे सरकार? आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी! असा फक्त आणि
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी भरघोस मदत देऊ अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र दिवाळी झाली तरीही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मदतीच्या नावाखाली तुटपूंज्या मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम सरकारने केले असल्याचा संताप काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
फक्त वल्गनाच शेतकऱ्यांना शेवटपर्यंत ऐकायला मिळणार? बाहेर शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगी कशी मिळते? त्यांच्याकडे तसा परवाना आहे का? की यामध्ये अर्थपूर्ण तडजोड होत आहे? याचा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या संबंधितांनी तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
२०२५ हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक गेले. कांदा, सोयाबीन,उन्हाळा कांदा , गहू, मका आदीसह सर्वच शेतमालाला अजिबात भाव नाही. मात्र याउलट शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी चे दर आभाळाला भिडले आहेत. शेतमालाचे दर मातीमोल झाले आहेत. संकट हे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही त्यामुळे सम्पूर्ण खरीब हंगाम ची वाट लागली आहे या सर्वांना आता शेतकरी पुरता वैतागला आहे येवला :दिनांक: 30 ऑक्टोबर/ अतिवृष्टीमधून जे काही थोडंफार वाचलं होतं, त्याची देखील हवामान बिघाडमुळे व परतीच्या मुसळधार पावसाने पुरती वाट लावल्याने कांद्याचा झाला बांधा, मका पिकाची व मका चारा ची झाली माती अशी वाईट अवस्था येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अंदरसूल सायगाव पांजरवाडी, तळवाडे, कौटखेडे, गारखेडे, अंगुलगाव, रेंडाळे, भारम, रहाडी, अंगुलगाव, न्याहारखेडे, ममदापुर, बोकटे रस्ते सुरेगाव आदी परिसरातील गावातील शेतकऱ्यांची झाली आहे.
गेल्या दिवाळी पासून सलग दिवस व रात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उरले सुरले काढलेला मका भिजला. कांद्याची टाकलेली रोपे धोपटल्याने उतार कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मका पिक काही प्रमाणात अतिवृष्टीमधून वाचले होते. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मका सोंगणी साठी मजूराचा तुटवडा निर्माण झाला. सुरुवातीला सहा हजार रुपये मका सोंगणीचा एक एकर भाव होता, तो दिवाळी च्या तोंडावर बारा हजार रुपये एकर झाला. तरीही मका सोंगणीला मजूर मिळेना. त्यामुळे शेतकरी हैराण झाला. शेवटी मजूर मिळाले तरी पावसाने डाव साधून धो-धो बरसला आणि मोठ्या प्रमाणात शेतात उभा असलेला मका भिजला. भिजलेला मका व्यापारी मातीमोल भावात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
शासकीय हमीभाव 2हजार 400 रुपये असतांना खाजगी व्यापारी चांगल्या एक नंबर प्रतीचा मका 1200 ते 1700 रुपये भावाने खरेदी करत आहेत. मग यावर शासनाचा अंकुश कसा नाही? वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला :दिनांक: 30 ऑक्टोबर/ अतिवृष्टीमधून जे काही थोडंफार वाचलं होतं, त्याची देखील हवामान बिघाडमुळे व परतीच्या मुसळधार पावसाने पुरती वाट लावल्याने कांद्याचा झाला बांधा, मका पिकाची व मका चारा ची झाली माती अशी वाईट अवस्था येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अंदरसूल सायगाव पांजरवाडी, तळवाडे, कौटखेडे, गारखेडे, अंगुलगाव, रेंडाळे, भारम, रहाडी, अंगुलगाव, न्याहारखेडे, ममदापुर, बोकटे रस्ते सुरेगाव आदी परिसरातील गावातील शेतकऱ्यांची झाली आहे.
गेल्या दिवाळी पासून सलग दिवस व रात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उरले सुरले काढलेला मका भिजला. कांद्याची टाकलेली रोपे धोपटल्याने उतार कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मका पिक काही प्रमाणात अतिवृष्टीमधून वाचले होते. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मका सोंगणी साठी मजूराचा तुटवडा निर्माण झाला. सुरुवातीला सहा हजार रुपये मका सोंगणीचा एक एकर भाव होता, तो दिवाळी च्या तोंडावर बारा हजार रुपये एकर झाला. तरीही मका सोंगणीला मजूर मिळेना. त्यामुळे शेतकरी हैराण झाला. शेवटी मजूर मिळाले तरी पावसाने डाव साधून धो-धो बरसला आणि मोठ्या प्रमाणात शेतात उभा असलेला मका भिजला. भिजलेला मका व्यापारी मातीमोल भावात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
शासकीय हमीभाव 2हजार 400 रुपये असतांना खाजगी व्यापारी चांगल्या एक नंबर प्रतीचा मका 1200 ते 1700 रुपये भावाने खरेदी करत आहेत. मग यावर शासनाचा अंकुश कसा नाही? हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी का केली जाते आहे? याची शासकीय चौकशी होऊन कारवाई होणार का? की नुसतेच हे शेतकऱ्यांचे सरकार? आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी! असा फक्त आणि
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी भरघोस मदत देऊ अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र दिवाळी झाली तरीही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मदतीच्या नावाखाली तुटपूंज्या मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम सरकारने केले असल्याचा संताप काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
फक्त वल्गनाच शेतकऱ्यांना शेवटपर्यंत ऐकायला मिळणार? बाहेर शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगी कशी मिळते? त्यांच्याकडे तसा परवाना आहे का? की यामध्ये अर्थपूर्ण तडजोड होत आहे? याचा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या संबंधितांनी तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
२०२५ हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक गेले. कांदा, सोयाबीन,उन्हाळा कांदा , गहू, मका आदीसह सर्वच शेतमालाला अजिबात भाव नाही. मात्र याउलट शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी चे दर आभाळाला भिडले आहेत. शेतमालाचे दर मातीमोल झाले आहेत. संकट हे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही त्यामुळे सम्पूर्ण खरीब हंगाम ची वाट लागली आहे या सर्वांना आता शेतकरी पुरता वैतागला आहे कमी भावाने खरेदी का केली जाते आहे? याची शासकीय चौकशी होऊन कारवाई होणार का? की नुसतेच हे शेतकऱ्यांचे सरकार? आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी! असा फक्त आणि
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी भरघोस मदत देऊ अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र दिवाळी झाली तरीही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मदतीच्या नावाखाली तुटपूंज्या मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम सरकारने केले असल्याचा संताप काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
फक्त वल्गनाच शेतकऱ्यांना शेवटपर्यंत ऐकायला मिळणार? बाहेर शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगी कशी मिळते? त्यांच्याकडे तसा परवाना आहे का? की यामध्ये अर्थपूर्ण तडजोड होत आहे? याचा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या संबंधितांनी तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
२०२५ हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक गेले. कांदा, सोयाबीन,उन्हाळा कांदा , गहू, मका आदीसह सर्वच शेतमालाला अजिबात भाव नाही. मात्र याउलट शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी चे दर आभाळाला भिडले आहेत. शेतमालाचे दर मातीमोल झाले आहेत. संकट हे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही त्यामुळे सम्पूर्ण खरीब हंगाम ची वाट लागली आहे या सर्वांना आता शेतकरी पुरता वैतागला आहे