नाशिक ग्रामीण

मोठी बातमी — मेंढ्या चोरांचा म्होरक्या पोलीसांच्या जाळ्यात ,,, वावी व नाशिक पोलिसांनी संयुक्त केला पर्दाफाश

वावी - सिन्नर परीसरात मेंढ्यांच्या वाड्यातुन चोरीच्या घटना ...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर  : दिनांक  , 9 सप्टेंबर  2025 — मागील काही महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव .दोडी. दुसंगवाडी .धोंडवीर नगर .तसेच राहता तालुक्यातील देर्डे कोर्याळे , पोहे गाव परिसरातील मध्यरात्रीच्या सुमारास शेत रस्त्यावर मुक्कामी असलेले मेंढपाळ यांचे असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने जवळच्या इरादेणे चोरून करून नेला याबाबत सिन्नर .वावी तसेच राहता पोलीस ठाण्यामध्ये मेंढ्या चोरीच्या अनुषंगाने

एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे होते .सदर घटनाबाबत मेंढपाळ कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते . या प्रकरणी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिशः लक्ष घालून यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक निरीक्षक श्री रवींद्र नगर व भावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकांनी यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच महाराष्ट्र व परराज्यातील अभिलेखा वरील आरोपींची माहिती घेऊन सदर घटनास्थळावरील उपलब्ध भौतिक पुरावाचे अचूक तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्हेगार हे राज्यस्थान राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजस्थान राज्यात जाऊन सलग चार दिवस संशयित आरोपींची हालचाली व बाळ ठेवून कोटा शहर राजस्थान परिसरातून सरळ गुन्हेगार रावल उर्फ राहुल बंजारा वय 21 राहणार कच्चा . कच्छा तलेरा जिल्हा बुंदी .राज्य – राजस्थान येथे शिताफीने ताब्यात घेण्यात आले .व विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे खालील नमूद साथीदारासह वरील मेंढ्या चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे .निष्पन्न आणि त्यांची नावे अब्दुल बारी .राहणार कोठा राज्यस्थान .राजू मदन बंजारा. रामा बंजारा .कछालिया गाव .जिल्हा बुंदी .राहणार राजस्थान .किसन काळू बंजारा. चिंटू कालू बंजारा बिंदू. राजू बंजारा सर्व राहणार कछालिया गाव जिल्हा बुंदी राज्यस्थान यातील ताब्यात घेतलेल्या पैकी आंतरराज्य गुन्हेगार राहुल उर् बंजारा हा या टोळीचा मोरक्या असून त्याच्यावर यापूर्वी राजस्थान राज्यात बकरी .व मेंढ्या

चोरीचे गुन्हे दाखल आहेत .

  ( गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त.. व पोलिस अधिकारी व कर्मचारी )

             हे सर्व आरोपी राजस्थान राज्यातील कोटा व बुंदी जिल्ह्यातील असून ग्रामीण भागामध्ये बकरी पालनाचा व्यवसाय करत आहे .त्यामुळे त्यांना मेंढ्यांच्या कळपाबाबत सखोल माहिती होती व अनुभव आहे. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील महामार्गालगतची मेंढ्या मेंढ्या रस्त्यावर मेंढ्याची चोरी करण्यासाठी ग्रामीण भागात पोहोचले याची तपासत माहिती समोर आल्याने सदर आरोग्याची टोळी दिवसांमध्ये पाहणी करून रात्रीच्या वेळी चार चाकी गाडी वाहनांमधून येऊन मिळण्याची चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले .तसेच चोरी केल्यानंतर सदर आरोपींनी यातील मुख्य आरोपीं  अब्दुल बारी यांचे मार्फत  विक्री केली असून त्यातून मिळालेले पैसे हे आपापसात वाटून घेतले असल्याचे निदर्शने आले आहे. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपीरावल उर्फ राहुल कालू बंजारा यांनी कबुली दिल्यावरून मेंढ्या चोरीची खालील गुन्हा उलगडण्यास व माहिती सांगण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे .वावी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर कलम 318 / 2025 ,  भा.न्यां .स. कलम  303( 2 ) सिन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर..521  / 20 25 भा.स.न्यां. कलम 303 ( 2 ) .वावी पोलीस स्टेशन र.गुन्हा नंबर 322 / 20 25 भा.स.न्तीयां. 303 ( 2 ) राहता पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर  गुन्हा रजिस्टर नंबर 335 /2025 भा.स.न्यां.कलम 303- ( 2 ). यातील ताब्यात घेतलेला रावल  बंजारा याने कबुली दिल्याबद्दल मेंढ्या चोरीची आणि इतर गुन्ह्याची उकल व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या कबुली जबाबातुन गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती कार ईको क्रमांक आर .जे 20 , यु. बी. 56 27 ही जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीचे सदर साथीदारांना पोलीस  शोध घेत असून चोरी गेलेल्या मेंढ्या कोणास व कोठे विक्री केल्या याबाबत पुढील तपास करत आहे. सदर आरोपीकडून मेंढ्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस  अधीक्षक श्री आदित्य मिरजेलकर. विनोद टिळे .दीपक गुंजाळ .सतीश गोटे .हेमंत गिलबिले .प्रदीप भैरव .विश्वनाथ  धारोळे .नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील मेंढ्यांचे चोरीच्या आठवणी भोगळी जाणून बेधडक कारवाई केले. या अनुषंगाने धडाकेबाज कामगिरी बजावली असून सराईत चोरीच्या मुसक्या आवळल्या आहे . त्यामुळे सर्वसामान्य समाजाची भिती कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त होत आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!