राजापूरच्या बँकेला टाळे ठोकण्यासाठी का झाले ग्राहक आक्रमक
राजापूरच्या बँकेला टाळे ठोकण्यासाठी का झाले ग्राहक आक्रमक

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला दिनांक 2 ऑगस्ट – तालुक्यातील राजापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आठ दिवस सर्वर बंद असल्याने बँक बंद होती
त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून लवकर बँक सुरू न झाल्यास या शाखेला ग्रुप लावण्याचा इशारा वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद जाधव यांनी दिला आहे
राजापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून या शाखेला दहा ते बारा गाव जोडलेले आहे
परंतु गेल्या आठवड्यात सोमवारपासून या बँकेचे सर्वर बंद असल्याने आठ दिवस बँक बंद होती या बँकेने एअरटेल व बीएसएनएल सेवा घेतलेली आहे
मात्र बीएसएनएलची सेवा गेल्या कित्येक महिन्यापासून कायमस्वरूपी बंद आहे
एअरटेल ची सेवा बंद झाल्याने बँकेची व्यवहार ठप्प झाले आठ दिवस बँक बंद राहिल्याने ग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते
पर्यायी व्यवस्था म्हणून येथील ग्राहक दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरसुल शाखेत जाऊन आपली तात्पुरती गरज भागवत होते
मात्र दररोज रोख भरणा करणाऱ्या व्यवसायिकांना मोठा फटका बसत होता वयोवृद्ध महिला पुरुषांना खूपच अडचणींना तोंड द्यावे लागत होते या शाखेंतर्गत बरेच बँक प्रतिनिधींची नियुक्ती केलेली आहे
परंतु या बँक प्रतिनिधींना बँक बंद असल्याने पैसे मिळत नसल्याने त्यांची सेवा ठप्प झाली होती
आठ दिवसापासून बँकेमध्ये लोकांचे कर्मचाऱ्यांबरोबर वाद होत होते अनेक अडचणींना कर्मचाऱ्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत होते
बँक का बर बंद अशी विचारणा ग्राहक करीत होते एक-दोन दिवस बँक बंद राहू शकते तब्बल आठ दिवस बँक बंद होती
त्यामुळे ग्राहकांच्या भावना तीव्र होत होत्या ग्रामीण भागातील एकमेव शासकीय बँक असल्याने ग्राहकांना या बँके शिवाय पर्याय नसल्याने मुकाट्याने त्रास सहन करावा लागला होता
या बँकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असता हा प्रॉब्लेम बँकेच्या नाही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीचा आहे बँक थोड्या दिवसात चालू होईल असे उत्तर अधिकारी देत होते
सदर बँक सोमवारी सुरू न झाल्यास ग्राहक या बँकेला ग्रुप लावणार आहे असा इशारा वंचित आघाडीचे जिल्हा उपप्रमुख दयानंद जाधव यांनी दिला आहे
आठ दिवसापासून बँक बंद असल्याने ग्राहकांना तोंड देता देता कर्मचारी नाकी नऊ झाले असून बँक बंद असल्याबाबत विचारणा करीत होते सेवा लवकर सुरू व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे परंतु तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे बँक बंद होती
संदीप वाल्मिकी
शाखाधिकारी राजापूर
आठवडाभर बँक बंद होती ग्रामीण भाग असल्याने अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही शहरी भागात बँक आठ दिवस बंद राहिली असती तर ग्राहकांनी हौदोष घातला असता
मात्र ग्रामीण भागामध्ये तसे होत नाही संयम ठेवतात कर्मचाऱ्यांना सहकार्य करतात यापुढे बँक सुरू न झाल्यास या बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे
दयानंद जाधव
वंचित आघाडीचे जिल्हा उपप्रमुख



