संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताई व संत सोपानदेव आषाढी निर्मलवारीसाठी शासनाकडून मिळणार इतके कोटी रूपये
पाठपुराव्याला आले यश..संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताई व संत सोपानदेव आषाढी निर्मलवारी करता शासनाकडून २० कोटी रुपये निधी देण्यात येईल
संस्थानचे माजी अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश…
Wegwan nashik/ वेगवान नाशिक
२५ मे, नाशिक – आषाढी वारीच्या काळात पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, मोबाईल टॅायलेट इ. साठी भरीव निधी मिळावा व हा निधी कायम व्हावा अशी आग्रही मागणी आपण #आषाढी पायी पालखी सोहळा २०२३ च्या वेळी #मा. मुख्यमंत्री महोदयांकडे संस्थांनाच्या वतीने केली होती, यासाठी अध्यक्ष या नात्याने नीलेश गाढवे व सचिव ॲड.सोमनाथ घोटेकर व विश्वस्त मंडळाने वारंवार पालकमंत्री दादा भुसे नाशिकचे विभागीय आयुक्त, कलेक्टर, जिल्हा परिषदेच्या सी.ओ. यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता…
२०२३ च्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या ४ दिवस आधी दिल्लीत तातडीने जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांना तातडीने आदेश देऊन पालखी सोहळ्यास निधी मंजूर करून इतिहासात प्रथमच आपल्या पालखी सोहळ्यासाठी मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करून दिले होते व प्रत्येक पालखी तळावर मुक्कामाच्या ठिकाणी शासनाने घेतलेली दखल ही उल्लेखनीय होती.दरवर्षी वारीसाठीचा भरीवनिधी कायम व्हावा व इतर पालखी सोहळ्यांप्रमाणे विश्वगुरूंच्या या पालखी सोहळ्याचा निर्मल वारीत समावेश व्हावा व सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी आपली मागणी होती. खासदार श्रीकांत शिंदे व खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असल्याने यावर्षीपासून संत ज्ञानोबाराय व संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे विश्वगुरू संत श्रीनिवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला कायमस्वरुपी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज,संत सोपानदेव व आदिशक्ती संतमुक्ताई अश्या तीन पालखी सोहळ्यानसाठी २० कोटी रुपये प्रत्येक वर्षी उपलब्ध करून दिले जाणार आहे, म्हणजे जवळ जवळ ७_कोटी रुपये संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यास अनेक सुविधांसाठी शासन खर्च करणार आहे, संस्थांसाठी ही आनंदाची बाब असून केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याचे समाधान
असुन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे संस्थानचे माजी अध्यक्ष तथा जीर्णोद्धार, मंदिर विकास समितीचे मुख्य ससमन्वयक व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेश सहअध्यक्ष नीलेश गाढवे पाटील यांचेसह संस्थानचे विश्वस्त व सदस्य यांनी आभार मानले आहे.