सिन्नरः भैरवनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
शहा, ता. 22 में 2024 – शहा ( प्रतिनिधी )ता.21मे तालुक्यातीलम माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित शहा च्या भैरवनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळाले असुन विद्यालयाचा निकाल 96.29% इतका लागला असून त्यामध्ये कुमारी सानिया शाकिर सय्यद 81.67% तर द्वितीय क्रमांक कुमार अभिषेक भाऊसाहेब हांडोरे 81.50% तर तॄतिय क्रमांक कुमारी स्वाती दगु साप्ते 76.67% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री आण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष दौवलतराव मोगल जेष्ठ संचालक विजय आप्पा गडाख,सी.ई.ओ.अभिषेक गडाख, प्राचार्य नामदेव काणसकर,परिवेक्ष रमेश रौधंळ, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक प्रमोद बधान , सचिन रानडे, वर्गशिक्षक रविंद्र डावरे अमोल व्यवहारे , आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे,
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री आण्णासाहेब गडाख यांनी सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्या यशस्वी योगदानाबद्दल आभार व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी एवढे प्रचंड यश मिळवतात याचा मला सार्थ अभिमान आहे असेही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
तालुक्यात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.तालुक्याचे माजी आमदार श्री सुर्यभान नाना गडाख यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.. दरवर्षी या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
येथील श्री कालभैरवनाथ हायस्कूल व एस.जी.जुनियर काॅलेजने यशाची परंपरा कायम राखली असुन या संस्थेच्या तालुक्यात अनेक शाखा आहे असुन या सर्व विद्यालयाचा निकाल समाधानकारक लागला आहे.त्यामुळे संवस्थेच सर्व स्थरावर कौतुक होत आहे.
प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यी कुमारी सानिया शाकिर सय्यद हिला एकुण 600 पैकी 490 गुण 81.67% मिळाले असुन द्वितीय क्रमांकने उत्तीर्ण विद्यार्थ्यी कुमार अभिषेक भाऊसाहेब हांडोरे याला 600 पैकी 489 गुण 81.50% तर तृतीय क्रमांक कुमारी स्वाती दगु साप्ते 460 गुण 76.67% मिळवून क्रमांक पटकावला आहे,
संवस्थेचे अध्यक्ष सन्मानिय श्री आण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौवलतराव मोगल.जेष्ठ संचालक आप्पासाहेब गडाख.व्यवास्थापक अभिषेक गडाख. प्राचर्य काणसकर सर.परिवेक्षक रौधंळ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन … संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या