शहराच्या विकासात रस्ते बजावतात मोलाची भूमिका
वेगवान नाशिक/Wegwan Nashik.-
विशेष प्रतिनिधी, ४ जानेवारी-
कोणत्याही शहराच्या विकासासाठी तेथील दळणवळण सुविधा कशा आहेत हे पहिले बघितले जाते त्यामुळे संबंधित शहराच्या विकासात रस्ते हि मोलाची बजावत असल्याचे प्रतिपादन देवळाली कॅम्प पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी केले.
येथील वॉर्ड क्रं.२ मधील विविध रस्ते डांबरीकरणाच्या कामासाठी माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी कॅटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून १६ लाख रु. खर्चाच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.येथील लेव्हीट मार्केट
जवळील बोहरी जमातीच्या मस्जिद जवळ आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सचिन ठाकरे, बाबूशेठ कृष्णानी, अजगरभाई इंदोरवाला, नरुद्दीनभाई कुलाबावाला,गौतम गजरे,लियाकत काझी, राहुल नानेगावकर, संतोष फल्लारे, सचिन घोडके, सोनू रामवाणी आदी उपस्थित होते. या रस्त्याच्या कामासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहाय्यक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता पीयूष पाटीलयांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन सतीश कांडेकर तर आभार सुरेश पाटील यांनी मानले.