जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अत्रेय बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याण उपक्रमाचे आयोजन.

वेगवान नाशिक:
येवला/२८ सप्टेंबर २०२४
जिल्हा क्रिडा कार्यालय नाशिक व अत्रेय बहुउद्देशीय संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने युवक कल्याण उपक्रमा अंतर्गत माय भारत पोर्टलवर युवा नोंदणी व विविध योजनांची माहिती देण्यात आली
केंद्र सरकारच्या समर्थ युवा, सशक्त भारत ह्या टॅगलाईननुसार १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान युवा नोंदणी, सेवा कार्य, व स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम सुरु असुन, याच अनुषंगाने आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी येवला येथील आदीवासी मुलांचे वस्तीगृह येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरूण थोरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले व युवा नोंदणी बाबत माहिती देऊन, माय भारत पोर्टलवर युवकांची नोंदणी करुन घेतली, यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरूण थोरे व वस्तीगृहाचे गृहपाल विक्रांत कुकडे, कनिष्ठ लिपिक हिरामण मेश्राम, कर्मचारी रविंद्र जाधव, उमाकांत थोटवे, संगीता आदी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतीनिधी, राजेश पवार, चेतन पावर, रोशन सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.