आजपासून शहा मध्ये कालभैरवनाथ यात्रेला प्रारंभ

वेगवान नाशिक / wegwan nashik news
भाऊसाहेब हांडोरे
शहा,सिन्नर, 21 एप्रिल 2024 – थे रविवारपासून होणाऱ्या कालभैरवनाथ यात्रेची तयारी पूर्ण झाली असून गावात व परिसरात उत्सवाचे वातावरण आहे.
दरवर्षी चैत्र शुद्ध द्वादशीला शहा.सोनांबे.सिन्नर.वडणेरभैरव . चांदे कासारे.आदी गावामध्ये एकाच दिवशी श्री कालभैरवनाथ यात्रा भरते. ती आठ दिवस चालते.शहा गावातील यात्रेसाठी महाराष्ट्रात व मुंबईच्या विविध कोपऱ्यात नोकरीसाठी गेलेले गावचे सर्व लोक परत मायदेशी यानिमित्त येतात.तसेच खेड्यापाड्यातील देखील हजारो भाविक यात्रेसाठी एक – एक दिवस अगोदर येतात.. तसेच विशेष म्हणजे असे की श्री कालभैरवनाथ हे देवस्थान श्री स्वामी समर्थ सेवेसाठी अग्रगण्य मानल्या गेल्याने या यात्रेला अधिक महत्त्व दिले जाते.
या निमित्त गावातील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.तसेच श्री कालभैरवनाथ मंदिरासह गावातील प्रत्येक मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.यात्रेच्या पहिल्या दिवशी रविवारी रात्री व पहाटे घरातील प्रत्येकी एक माणूस पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चास नळी, मंजूर, येथील गोदावरी नदीतून पाणी आणण्यासाठी जातो.हे येथील खास वैशिष्ट्य आहे.शिवाय वर्षभर घरातील प्रत्येक जण चास नळी मंजूर येथील गोदावरी नदीतून पाण्याची कावड खांद्यावर घेऊन आणण्यासाठी पायी चालत आणण्यात येते व श्री कालभैरवनाथ मुर्तीला जल अभिषेक केला जातो.
त्या दिवशी सकाळी सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता टांग्याच्या शर्यती होणार असून परिसरातील सर्व यात्रे करू भैरवनाथाला गंगा स्नान घालण्यासाठी एकच गर्दी करतात.गावातील रिवाजाप्रमाणे पुजारी गणेश श्रीमंत ( गुरव.)कैलास श्रीमंत ( गुरव) दोघे बंधू भैरवनाथाला प्रथम स्नान घालतात व नंतर इतर भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जातो.दुपारी चार वाजता श्रीकाभैरवनाथ पालखीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते.रात्री दहा वाजता पाच ते सहा तास शोभेची दारू उघडली जाते. नंतर पुन्हा रात्री तिन ते चार च्या दरम्यान श्री कालभैरवनाथ ची पालखीची व सर्व रथांची मिरवणूक काढली जाते.
या मिरवणूकीत सर्व रथांसाठी लागणाऱ्या बैलं धरण्यासाठी अनेकांची इच्छा( धावपळ) असल्याने जो जास्त बोली देईल ( वर्गणी स्वरूपात ) त्याला बैलं धरण्यासाठी संधी दिली जाते… सकाळी गंगा स्नान झाल्यानंतर ज्या भाविक भक्तांनी नवस केला आहे ते नवस दिवसभर लोटांगण , पायघड्या , दंडवत,स्वरूपात विशेष करून स्त्रियांकडून फेडले जातात आणि ते पूर्ण ही होतात हे विशेष ….
या वर्षी भैरवनाथ यात्रेसाठी गावातील लोकांचा भरपूर प्रतिसाद लाभेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.