मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून ‘ यांनी ‘ पदभार स्वीकारला

वेगवान नाशिक /Wegwan Nashik –

 विशेष प्रतिनिधी,३० जानेवारी-

मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून श्री. प्रतीक गोस्वामी यांनी दि. २९.०१.२०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे.

ते भारतीय रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस १९९० च्या बॅचचे अधिकारी असून मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते मध्य रेल्वेचे वरिष्ठ उप महाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते तसेच ते कोंकण रेल्वे महामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

श्री प्रतीक गोस्वामी हे जयपूरच्या मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (MNIT) स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (IIT) पदव्युत्तर पदवीधर आहेत. १९९० मध्ये ते भारतीय रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसमध्ये सामील झाले.

 

३४ वर्षांच्या त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीत, श्री गोस्वामी यांनी भारतीय रेल्वे आणि इतर संघटनांमध्ये विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

श्री गोस्वामी यांना सार्वजनिक खरेदी, कंत्राट व्यवस्थापन व साहित्य वितरण या क्षेत्रात १८ वर्षांहून अधिक काळाचा मोठा अनुभव आहे, त्यांनी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये त्यांच्या कार्यकाळात वंदे भारत एक्सप्रेससाठी घटक (Components) साहित्य खरेदी करण्यात आणि ते वेळेवर वितरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माननीय पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या प्रारंभ करण्यात योगदान देणारी भूमिका त्यांनी राबवली.

पश्चिम रेल्वेच्या भावनगर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून, श्री गोस्वामी यांनी हाई राइज ओव्हरहेड इक्विपमेंटवर पहिली फुल डबल स्टॅक कंटेनर ट्रेन सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जो एक जागतिक विक्रम आहे.

 

श्री. गोस्वामी यांना दक्षता संघटन कार्यात मोठा अनुभव आहे. त्यांनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य दक्षता अधिकारी व भारत नागरिक विद्युत निगम लिमिटेडमध्ये मुख्य दक्षता अधिकारीचा अतिरिक्त कार्यभार संभाळला आणि पश्चिम रेल्वेमध्ये उपमुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांना २०१७ मध्ये भारताच्या तत्कालीन माननीय उपराष्ट्रपतींच्या हस्ते केंद्रीय दक्षता आयोगाकडून “दक्षता उत्कृष्टता पुरस्कार” देखील मिळाला आहे. त्यांनी वडोदरा येथील राष्ट्रीय भारतीय रेल्वे अकादमीमध्ये (NAIR) साहित्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षणाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी भारतातील आणि परदेशातील विविध संस्थांमध्ये जसे की आयआयएम-अहमदाबाद, आयएसएम-हैदराबाद, एएससी-हैदराबाद, एसडीए-बोकोनी-इटली, ईएमएल-फ्रांस, इनसीड-सिंगापूर आणि आयसीएलआयएफ-मलेशिया यांमध्ये व्यवस्थापन, वित्त, खरेदी,व दक्षता आणि प्रशासन इत्यादी विविध प्रशिक्षण सत्रांद्वारे आपले कौशल्य समृद्ध केले आहे.

 

अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून त्यांच्या नवीन पदावर, श्री प्रतीक गोस्वामी मध्य रेल्वेची वाढ आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी व त्यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा होईल.

Back to top button
error: Content is protected !!