एस एल एम स्कूल मध्ये ग्रँड पेरेन्ट्स डे साजरा

देवळाली कॅम्प:-

येथील विजय नगर परिसरात असलेल्या एसएलएम या प्राथमिक शाळेत आजी आजोबांसोबत विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम साजरे करत ग्रँड पेरेन्ट्स डे साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली ताजनपुरे तर प्रमुख अतिथी म्हणून हौसाबाई कुवर,सुनीता लकारिया आदी उपस्थित होत्या. या उपक्रमाप्रसंगी तीस पेक्षा जास्त आजी-आजोबा उपस्थित होते. सरस्वतीचे पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसाठी विविध गाणी सादर केली.उपस्थित आजी आजोबांसोबत व आपसामध्ये विविध खेळ खेळविण्यात आले.

सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात.आजी आजोबा पहिले मित्रच असतात.नात्याची तेव्हा तिथूनंच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नातं पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असल्याचे शाळेच्या संचालिका पुनम ताजनपुरे यांनी सांगितले सूत्रसंचालन भाग्यश्री देशमुख तर आभार मनीषा मंडलिक यांनी मानले. यानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तर आजी-आजोबांसाठी नाश्त्याची व्यवस्था ही करण्यात आली होती.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

 

Back to top button
error: Content is protected !!