घोटी बाजारपेठ झाली ठप्प !

वेगवान नाशिक / उत्तम गायकर
इगतपुरी : आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अतिशय जोरदार पावसाची सुरुवात झाली. आणि पहिल्याच पावसात अक्षरशः घोटी बाजारपेठ ही ठप्प झालेली दिसली.
उकाड्याने हैरान झालेला निसर्गातील प्रत्येक जीव हा आज पहिल्या पावसाने शांत झाल्याचा दिसला .खऱ्या अर्थाने मृतिका गंधाचा दरवळ सर्वत्र पसरला होता. जोरदार पावसाची बॅटिंग पाहून शेतकऱ्यांना हायसं वाटलं. आता मात्र पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात होणार असून भात पेरणीची उद्यापासून धावपळ सुरु होणार आहे .
सूर्याचा मुर्गशीर्ष नक्षत्रात प्रवेश असून वाहन हा कोल्हा आहे . मृग नक्षत्र जरी सात तारखेला लागणार असले तरी पूर्व संधेला पडलेला पाऊस हा मशागत व पेरणीसाठी अनुकूल असल्यामुळे खरीपाच्या काळात भात ,नागली, वरई सोयाबीन पेरणीला उद्यापासून बहर येणार असल्याने इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी आज सुखावल्याचे चित्र दिसत आहे .