देवळालीतील काँक्रिटीकरण रखडल्याने व्यावसायिक नागरिकांमधून संताप

देवळालीतील काँक्रिटीकरण रखडले

लेव्हीट मार्केटसह स्थानिकांची होतेय गैरसोय

वेगवान नाशिक/Wegwan nashik

देवळाली कॅम्प :-   गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालखंडापासून येथील वडनेर रोडचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु असल्याने येथील व्यवसायिकांसह वडनेर रोड भागातील नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

   देवळालीकरांच्या सोयीसाठी खासदार निधीतून गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुमारे ९ कोटी २० रु. कामे मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी आगामी निवडणुकीच्या आत सर्व रस्त्याची कामे पूर्ण केली जातील असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात निवडणुका होऊन गेल्या तरी कामे रेंगाळली असल्याचे वास्तव आहे. आता अवघ्या एक-दोन आठवड्यावर पावसाळा येऊन ठेपल्याने सुरु असलेल्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक कालखंडापासून लेव्हीट मार्केट परिसरात रस्ता खोदून ठेवला असून अर्ध्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येऊन उर्वरित काम रखडले आहे. झेंडा चौकाकडे जाणारा रस्ताही खोदून ठेवल्याने

सांयकाळच्या वेळी येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याशिवाय कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल व कॅन्टोन्मेंट लायब्ररी यासारख्या महत्वाच्या ठिकाणाकडे जातांना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील लेव्हीट मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मोठी अडचण या अर्धवट स्थितीतील कामामुळे झाली आहे. संबंधित कंत्राटदाने रखडलेले हे काम पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्याची मागणी येथील व्यासायिकांसह नागरिकांमधून केली जात आहे.

 

 

Back to top button
error: Content is protected !!