नांदगाव मध्ये पैशाचा पाऊस पाडणारे सापडले

वेगवान मराठी / मारुती जगधने

नाशिक, ता. 4 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या मार्फत वेळोवेळी सातत्याने जनजागृती केली जात असते तरीदेखील लोक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याच्या घटना घडत आहेत अशाच प्रकारची घटना नांदगाव शहरात घडली आहे याबाबत सविस्तर असे कि पैशाचा पाऊस पाडून देणाऱ्या भोंदू बाबा शी त्यांनी डील केली ठरलेल्या वेळेनुसार ठरलेल्या ठिकाणी भोंदू बाबा कडून पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पैशाचा पाऊस न पडल्याने निराशा झाले मग आता करायचे काय म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या नी त्या भोंदू बाबाचे अपहरण केले एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना नांदगाव शहर व परिसरात घडली या घटनेशी निगडित असलेल्या खंडणीचा गुन्हा चाळीसगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे घटनेच्या मुळाशी पोहोचले असता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व नांदगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संशयित आरोपींना गजाआड केले

याबाबत पोलिसांनी दिलेले माहितीवरून चोऱ्या चपात्या करून रस्ता लूट करून नागरिकांना आडवुन त्यांच्याकडून पैसे सोने मौल्यवान वस्तू जबरीने चोरणे आधी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे जयेश दत्तात्रय शिंदे वय 28 राहणार सैनिक कॉलनी चाळीसगाव जिल्हा जळगाव, श्रावण पुंडलिक बागोरे राहणार स्वामी विवेकानंद नगर नांदगाव जिल्हा नाशिक, जनार्धन उर्फ राजू बाळू आवारे मुंबई ,सोनू मुंबई पूर्ण नाव माहित नाही या चार गुन्हेगारांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्या चाळीसगाव येथील गणेश रामचंद्र राठोड राहणार रावले तालुका चाळीसगाव या भोंदू बाबाच संपर्क केला भोंदू बाबा ने पाऊस पाडण्याच्या बदल्यात एक विशिष्ट रक्कम घेतली त्यानुसार नांदगाव येथील स्मशानभूमीत मध्यरात्री पाऊस पाडायचे ठरले ठरलेल्या वेळेत मध्यरात्री वेगवेगळ्या वाहनातून त्या भोंदू बाबा सह हे चार जण स्मशानभूमीत दाखल झाले.

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा मांडली पूजा झाली आणि पैशाचा पाऊस पाडण्याचा खेळ सुरू झाला. मात्र प्रयोग सपशेल फसला प्रयत्न करूनही पैशाचा पाऊस पडला नाही गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या त्या चार गुन्हेगारांनी बाबाकडे दिलेल्या डिल केलेल्या पैशाची मागणी केली मात्र भोंदू बाबा ने पैसे देण्यास नकार दिला यावरून भोंदू बाबाला धडा शिकवायचा म्हणून या गुन्हेगारांनी भोंदू बाबाचे अपहरण केल्याचा बनाव रचला अन भोंदू बाबाच्या मुलाकडे 25 लाख रुपयांची मागणी केली पैसे घेऊन नांदगाव ये असे सांगितले पैसे आणून न दिल्यास भोंदू बाबाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली एवढे पैसे कुठून आणायचे म्हणून डॉक्टर असलेल्या मुलाने पोलिसास धाव घेत धडक सदर प्रकार जळगाव पोलिसांच्या कानावर घातला जळगाव स्थानिक गुन्हा शाखेने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली दूरध्वनीद्वारे या

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नांदगाव सी संबंध आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी नांदगाव पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर नांदगाव यांच्याशी संपर्क केला आणि त्यांची मदत मागितली आणि तपासाची चक्रे गरगर फिरू लागले नंबरचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले गेले त्यानुसार जळगाव आणि स्थानिक गुन्हे शाखा व नांदगाव पोलिसांनी अधिकारी व कर्मचारी अशा 18 लोकांच्या वेगवेगळ्या तुकड्यांच्या माध्यमातून सापळा रचत मोबाईल लोकेशन मांडवड शिवार दाखवत असल्याने पोलिसांनी तातडीने धाव घेतली मांडवड शिवारात त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली चार जणांपैकी दोघेजण एका कारसह मांडवड शहरातील एका शेतात लपून बसले होते तर अपहरण केलेल्या भोंदू बाबा घेऊन इतर दोघेजण हे विंचूर लासलगाव मार्गावरील जंगलात गेले तेथे त्यांनी बाबाचे हातपाय बांधून मारहाण करत तिकडेच टाकून दिले पोलिसांनी मांडवड शिवारातून दोघांना एका कारसह दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखवला असता त्यांनी बाबाला लासलगाव शिवारात घेऊन गेले असल्याची कबुली दिली पोलिसांनी आपला मोर्चा लासलगाव कडे वळवला विंचूर लासलगाव परिसरातील त्या जंगलाचा शोध घेतला असता त्या भोंदू बाबाला हातपाय बांधून मारहाण करीत बेशुद्ध अवस्थेत तेथे सोडून दिल्याचे समजले याबाबतची खात्री झाल्यानंतर इतर तिघांनी तेथून मुंबईच्या दिशेने पळ काढला पोलिसांनी भोंदू बाबाचा मागवा घेत त्यास शोधले व अपहरण नाट्यातून त्याची सुटका केली एकूणच एखाद्या चित्रपटाला साजेशी ही घटना नांदगाव शहरांमध्ये परिसरात घडली.

स्थानिक गुन्हे शाखा जळगाव नांदगाव पोलिसांच्या कमगिरीने एक मोठा प्रकार यातून उघड झाला घटनेत बाबत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार मुरलीधर धनगर ,संदीप पाटील, पोलीस शिपाई महेश पाटील, जितू पाटील, ईश्वर पाटील ,भूषण शेलार, सागर पाटील ,भूषण पाटील ,चालक दीपक चौधरी, आदीसह नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर आदीसह पोलीस शिपाई सरदार सिंह मेहेरे व दत्ता सोनवणे आदींचे या पथकात सहभाग होता अशा या प्रकरणातून पावसाचं नाट्य अखेर नाट्यच राहिल. आणि भोंदू बाबा सह इतर गुन्हेगारांची पितळ उघडे पडले.

Back to top button
error: Content is protected !!