बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा लढा – माजी खासदार समीर भुजबळ
बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा लढा - माजी खासदार समीर भुजबळ

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला,दि.१ नोव्हेंबर :- महाराष्ट्रासह देशभरातील दीन दलीत, मागासवर्ग बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली. गेली ३३ वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटना अविरत काम करत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ३३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले नाट्यगृह येवला तसेच संपर्क कार्यालय येवला येथे आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, समाधान जेजुरकर, राजेश भांडगे, अमजद मेंबर, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, शफीक शेख, बबलू शेख, अल्केश कासलीवाल, सुभाष गांगुर्डे, भूषण लाघवे, सोहेल मोमिन, सुहास भांबारे, विजय खोकले, सुमित थोरात, सचिन सोनवणे, सोनाली जेजुरकर, सीमा गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विकी बिवाल, चंद्रकांत साबरे, विशाल परदेशी, नितीन आहेर, सौरभ जगताप, समाधान पगारे, आदित्य कानडे, संतोष जेजुरकर, योगेश तक्ते, पंकज भांबरे, दीपक पवार, मतीन अन्सारी, संतोष जगदाळे यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, देशभरात महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले. मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभरात जनजागृती करण्यासाठी मेळावे व आंदोलने उभारली.
मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ नामांतरासासाठी अखिल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने लढा दिला. जातनिहाय जनगणना करण्यासाठी गेली ३२ वर्ष लढा दिला. राज्यात मंडल आयोगाच्या अंमलबजावणी करण्यात समता परिषदेचे भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, ओबीसी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे गेल्या ३३ वर्षांपासून लढत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली देशात जातनिहाय जनगणना होण्यासाठी खासदारांचे संघटन करून संसदेत आवाज उठविण्यात आला. संघटनेच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे हे संघटनेचे मोठ यश असून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली देशभरात हा लढा अविरत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.



