नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगाव-मालेगाव रोडवर भीषण दुचाकी अपघात; दोघांचा मृत्यू

Nandgaon News

नांदगाव-मालेगाव रोडवर भीषण दुचाकी अपघात; दोघांचा मृत्यू

वेगवान मराठी | मारुती जगधने १९ November २०२६

नांदगाव : नांदगाव-मालेगाव रोडवर १८ नोव्हेंबरच्या राजी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात गणेश अण्णासाहेब चव्हाण (वय ४५, रा. वखारी, ता. नांदगाव) आणि गणेश जिभाऊ पवार (वय ५०, रा. साकोरा, ता. नांदगाव) यांना गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी
नांदगाव-मालेगाव रोडवर दोघांच्या दुचाकींचा अपघात झाला. अपघाताची धडक इतकी भीषण होती की, दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे वखारी आणि साकोरा परिसरात शोककळा पसरली असून, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण, सावधगिरी आणि वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्दैवी घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

सदर घटना नांदगाव नजीक श्रीराम नगर हद्दीमध्ये विष्णुनगर येथे घडला
दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी अहिंसा चौकामध्ये झालेल्या अपघातात मालेगाव येथील रहिवासी असलेले दाभाडे नामक युवकाचा मृत्यू झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!