नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नूतन कासलीवाल नांदगाव शाखेच्या चेअरमनपदी; रामदास आहिरे यांची व्हा. चेअरमनपदी निवड

Nandgaon News

नूतन कासलीवाल नांदगाव शाखेच्या चेअरमनपदी; रामदास आहिरे यांची व्हा. चेअरमनपदी निवड

गोविंदराव नाना सोनवणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापनात नवे नेतृत

वेगवान मराठी 😐 मारुती जगधने ३० October २२६

नांदगाव : नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंदरसूल या संस्थेच्या नांदगाव शाखेच्या चेअरमनपदी नूतन मोतीलाल कासलीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी रामदास जिभाऊ आहिरे यांची निवड करण्यात आली.

दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या निवड प्रक्रियेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. अंदरसूल येथील मुख्यालय असलेल्या या संस्थेची स्थापना १९८८ मध्ये झाली असून, संस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. नाशिकसह चार जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत.

यावेळी संस्थेचे मुख्यालयाचे चेअरमन बाळासाहेब पुंड, व्हा. चेअरमन निवृत्ती ढोले, संचालक अमोल सोनवणे, मकरंद सोनवणे तसेच शाखा समिती सदस्य कमलताई अनिलकुमार शिंदे, खान अल्ताफ हुसेन ताजदार खान, रमेश करवा, डॉ. यशवंत जाधव, सचिन कोरडे, सुरेश गायकरवाड, सुभाष बनकर, गंभीर सोमासे, भास्करराव कदम, निलेश गायकरवाड, अनिलकुमार शिंदे, गणेश सरग आदी उपस्थित होते.

संस्थेचे व्यवस्थापक साहेबराव आहेर, शाखाधिकारी राजेंद्र गायकरवाड व सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर नूतन चेअरमन नूतन मोतीलाल कासलीवाल यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांना विश्वासात घेऊन कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या वतीने उपस्थित संचालकांचे आभार व्यवस्थापक साहेबराव आहेर

फोटो कॅप्शन : गोविंदराव नाना सोनवणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या नांदगाव शाखेच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर नूतन मोतीलाल कासलीवाल व व्हाईस चेअरमन रामदास आहिरे यांचा सत्कार करताना पदाधिकारी व संचालक मंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!