भेसळ माफियांविरोधातील कारवाईने नागरिकांमध्ये जागृती /Gutka माफिया वर mokha
Nandgaon news
भेसळ माफियांविरोधातील कारवाईने नागरिकांमध्ये जागृती /Gutka माफिया वर mokha
वेगवान मराठी: मारुती जगधने दि. 13 जुलै 2026
महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असला, तरी भेसळ माफियांविरोधात अपेक्षित प्रमाणात कठोर कारवाई झाली नसल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. फळे, सुकामेवा, भाज्या तसेच विविध खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक औषधे, कृत्रिम रंग आणि इतर घातक पदार्थांचा वापर करून विक्री केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
अशा परिस्थितीत प्रशासन आयुक्त Tukaram Mundhe यांनी अलीकडे केलेल्या धडक कारवाईमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नागरिकांचे लक्ष अन्नभेसळीच्या गंभीर समस्येकडे वेधले गेले आहे. खाद्यपदार्थांमध्ये किती प्रमाणात भेसळ होत आहे आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर कसा होतो, याची जाणीव सर्वसामान्यांना या कारवाईमुळे झाली आहे.
विशेषतः दुग्धजन्य पदार्थांमध्ये कृत्रिम आणि रासायनिक घटकांची भेसळ करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
यामुळे नागरिकांमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारांवर संबंधित यंत्रणांनी पुरेशी आणि प्रभावी कारवाई का केली नाही? मुंडे यांच्या कारवाईनंतर मात्र भेसळ माफियांच्या कारवायांवर कठोर नियंत्रण आणण्याची आणि दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या भेसळ माफियांविरोधात सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाई होणे ही काळाची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त केले जात आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली असून अन्नसुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याचा संदेशही समाजापर्यंत पोहोचला आहे.



