Uncategorized

ग्रामदैवत एकविरा माता यात्रा उत्सवाला प्रारंभ

Nandgaon news

वेगवान मराठी :मारुती जगधने
दिनांक २ एप्रिल २०२६ साडेतीन एकवीरा देवी पिठा पैकी नांदगाव येथील एकवीरा देवी हे पूर्ण पीठ आहे या देवीची यात्रा प्रारंभ झाला आहे .
नांदगाव येथे ग्रामदैवत आई एकविरा माता यात्रा उत्सवाचे औचित्य साधून तसेच हनुमान जयंतीच्या पावन मुहूर्तावर बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आमदार सुहास कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या वतीने मातेच्या चरणी अर्पण करण्यात आलेले मौल्यवान चांदीचे दागिने. श्रद्धेच्या भावनेतून स्वखर्चाने अर्पण करण्यात आलेल्या या दागिन्यांमध्ये गणपती मुकुट, एकविरा माता मुकुट, मातेचे चरण व पादुका तसेच दोन तलवारी आणि त्रिशूळ यांचा समावेश होता.
हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर दुपारी तीन वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली. एकविरा माता उत्सव समिती, नांदगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.
या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. संपूर्ण परिसर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. उत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामएकता, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडले.
दरम्यान, “हा उत्सव आमच्या गावच्या परंपरेचा मानबिंदू आहे. मातेच्या चरणी सेवा अर्पण करताना आम्हाला आनंद होत आहे,” अशी भावना आयोजक समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी शहरातील आजी माजी नगराध्यक्ष आजी-माजी नगरसेवक उद्योगपती व्यापारी पत्रकार व विविध पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काळात ही यात्रा पाच दिवस भरत होती आता ही यात्रा सात दिवस भरण्यात येणार आहे त्यामुळे या यात्रेचे महत्त्व अधिक वाढले असून यात्रेमध्ये विविध व्यावसायिक बचत गट आदिनादेखील यात्रा निमित्त व्यवसायाला संधी देण्यात आलेले आहे यासाठी स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे .गेल्या कित्येक वर्षानंतर माता एकविरा देवीला चांदीचे आभूषणे अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे .त्यामुळे नागरिकांच्या आनंदाचा पारा अधिक आनंदी झाला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!