शहा ; ” भैरवनाथ महाराज की जय ” घोषणांनी परिसर दुमदुमूला .. गंगाजल स्नानाने यात्रेला सुरुवात — !
शोभेच्या दारूची आताषबाजी व गंगाजल कावड मिरवणुक लक्षवेधी ... !
वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
[[ सिन्नर . दि : 1 एप्रिल 2026 — महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री कालभैरवनाथ यात्रेला प्रारंभ झाला असून आठ ते दहा किलोमीटर वरून आणलेल्या गंगेच्या ( गोदावरी ) पाण्याची भव्य दिव्य मिरवणूक आणि दिमाखदार सोहळ्यात सहभागी भाविक यांनी शहा परीसरात दुमदुमून निघाला आहे.. सकाळी गंगेच्या पाण्याची ( गोदावरी ) भव्य दिव्य आणि दिमाखदार मिरवणूक नंतर भैरवनाथ मुर्ती गंगाजल अभिषेक तर रात्री शोभेच्या दारूची आताषबाजी हे या यात्रेची खास वैशिष्ट्य आहे
——- भैरवनाथाची पांढरी —–
. या शहा नगरीत दुमजली इमारत चालत नाही त्यामुळे या गाव व परीसरात अजुन पर्यंत कुणीही दोन मजली इमारत बांधण्याचा प्रयत्न केला नाही.. काहींनी तो प्रयोग करून पाहिला परंतु त्या कुटुंबाला आलेला चमत्कार व अनुभव लक्षात आल्यानंतर मोठा खर्च करून बांधलेल्या दुमजली इमारत पाडण्याची नामुष्की ओढवली असल्याची चर्चा आहे. हि भैरवनाथाची पांढरी आहे येथे अती चालत नाही. देवापेक्षा कोणी मोठा नाही अशी श्रद्धा व विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे .
जवळपास दीडशे वर्षे परंपरागत चालत आलेली रुढी परंपरा आजही कायम जिवंत ठेवून भैरवनाथ महाराजांवर श्रद्धा असल्याचं सिद्ध झाले आहे..
शहा येथील काल भैरवनाथ यात्रेची 31 तारखेपासून सुरुवात … 1 एप्रिल ला भव्य गंगेचं पाणी मिरवणूक —

— शिवाचा अवतार काल भैरवनाथ महाराज यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार असून या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे .गावातील प्रत्येक मंदिरावर रंग रंगोटी व विद्युत रोशनी करण्यात आली असून गावातील रस्ते यांची साफसफाई केली आहे.
दिनांक 31 मार्च पासून सुरू होणाऱ्या यात्रेच्या उत्साहात आदल्या दिवशी येथील प्रत्येक माणूस हा कालभैरवनाथ महाराज यांचा स्नान व गंगापूजनासाठी परंपरेनुसार परिसरातील संपूर्ण गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणूस हा शहा पासून नऊ ते दहा किलोमीटर असलेल्या चास नळी किंवा मंजूर अथवा माहेगाव देशमुख येथून गंगा गोदावरीचे जल आणण्यात येत असते परंपरेनुसार पाणी आणायला जाणाऱ्या नागरिकांनी पुऱ्या खाऊनच गेलं पाहिजे अशी परंपरा असल्याने प्रत्येक घरात या काळात पु-या बनवल्या जातात व त्या पाणी आणणाऱ्या व्यक्तीला खायला दिल्या जातात बदलत्या काळानुसार हल्ली लोक पहाटे किंवा सकाळी आपल्या साधनाने पाणी आणू लागल्याने काळात बदल झाला आहे परंतु यानिमित्ताने परंपरा ही कायम राहील याची दक्षता घेतली जाते. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी मुंबई .पुणे औरंगाबाद. अहिल्यानगर येथे नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणारे प्रत्येक कुटुंब व त्यांचे नातेवाईक यात्रेच्या आदल्या दिवशीच शहा येथे मुक्काम येत असतात त्यामुळे परिसरात संपूर्ण वातावरण हे उत्साह पूर्ण व गजबजलेलं पाहायला मिळत आहे.
यात्रेच्या दिवशी सकाळी सातच्या दरम्यान गोदावरी वरून आणलेल्या गंगेच्या पाण्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक करण्यात येत असते या मिरवणुकीत गळवंती या रथाचे खास वैशिष्ट्य असल्याने प्रेक्षकांचा आकर्षक बनत आहे. तसेच गोदावरीच्या पाण्याच्या मिरवणुकी दरम्यान भैरवनाथाचे पुजारी गुरव श्रीमंत बंधू हे गंगेच्या पूजनाच्या पाण्याचे नेतृत्व करत असतात व प्रथम पुजारी गंगेचं पाणी घालतो व नंतरच भाविकांना मंदिरात पाणी घालण्यासाठी प्रवेश दिला जातो.
यादरम्यान पुजारी यानंतर प्रथम कोण पाणी घालतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असते.यासाठी स्पर्धा लागलेली असते व प्रथम पाणी घालणाऱ्याचा एकच जयजयकार होत असल्याने ही स्पर्धा लक्षवेधी ठरते.
नवसाला पावणाऱ्या श्री . काल भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने लोटांगण. पायघड्या घालून आपला नवस पूर्ण केला जातो . तसेच दुपारी चार वाजता भैरवनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी व पूजन करण्यासाठी रथामधून भैरवनाथाची मिरवणूक काढल्या जाते व प्रत्येक घरापुढे नैवेद्य दाखवून यथावकाश येथोजीत पूजा करून भरवनाथाला मान सन्मानाचा प्रसाद दिला जात असतो.
यात्रेनिमित्त शोभेच्या दारू उडवली जाते हे या यात्रेची खास वैशिष्ट्य असल्याने सिन्नर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी केली करतात. रात्री उशिरापर्यंत शोभेची दारू उडावल्यानंतर पहाटे तीन ते चार च्या दरम्यान भैरवनाथाच्या मूर्तीच्या रथासह दिवसभर निघालेल्या सर्वच रथांची एकाच वेळेस गावातून पुन्हा अंतिम मिरवणूक काढून यात्रेची सांगता होत असते अशा या यात्रेच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाला 31 तारखेपासून सुरुवात होत आहे. नवसाला पावणारा भैरवनाथ अशा या देवाची ख्याती असल्याने यात्रेला वेगळेच महत्त्व प्राप्त होत चालले आहे.



