Uncategorized

बाजार समिती चेअरमन उप चेअरमन निवड

Nandgaon news

वेगवान मराठी : मारुती जगधने
दि . 30 मार्च 2026

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडीत एकनाथ सदगीर यांची सभापतीपदी तर यज्ञेश (कान्हा) कळंत्री यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. ही निवड आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या निवडीबद्दल आमदार निवासस्थान ‘देवाज् बंगलो’ येथे सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सदगीर आणि कळंत्री यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला धनंजय कांदे, किरण कांदे, माजी सभापती तेज कवडे, विलास आहेर, नगराध्यक्ष सागर हिरे यांच्यासह बाजार समितीचे संचालक मंडळ आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीमुळे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!