Uncategorized

बडोदा बँक आणि ज्वलर्स चोरीचा प्रयत्न ?

Nandgaon news

शहरात बडोदा बँक आणि ज्वलर्स चोरीचा प्रयत्न असफल

वेगवान मराठी : मारुती जगधने
दि .29 मार्च 2026
नांदगाव – शहरात मध्यरात्री अज्ञात भामट्यांनी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. भामट्यांनी Bank of Baroda शाखा तसेच Dusane Jewellers या ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, दि 28 मार्च रात्री उशिरा ते 29 .मार्च दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी प्रथम बँकेच्या शटरला लक्ष्य केले. शटर उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आत प्रवेश केला पण तिजोरीला लॉक असल्याने हात लावता आला नाही. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या दुसाणे ज्वेलर्स दुकानाकडे मोर्चा वळवला. तेथेही शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काही कारणास्तव चोरी पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले.या दोन्ही घटना नांदगाव शहराच्या मध्यवर्ती व्यापारी पेठेत घडले .
घटनेची माहिती सकाळी स्थानिक नागरिकांना मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना तत्काळ कळवण्यात आले , घटनास्थळी पाहणी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नांदगाव शहरात घडलेली ही चोरीच्या प्रयत्नाची घटना खरोखरच चिंताजनक आहे. सुदैवाने, चोरट्यांना यश आले नाही, परंतु या घटनेने शहरातील सुरक्षा आणि पायाभूत सुविधांमधील मोठ्या त्रुटी समोर आणल्या आहेत.

​चोरीचा अयशस्वी प्रयत्न: चोरट्यांनी ‘बडोदा बँक’ आणि ‘दुसाने ज्वेलर्स’ यांसारख्या मोठ्या ठिकाणांना लक्ष्य केले. लॉक तोडण्यात अपयश आल्याने मोठी हानी टळली असली तरी, अशा घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
​अतिक्रमणामुळे अडथळे: पोलीस पथक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना रस्ते इतके अरुंद होते की गाडी जाऊ शकली नाही.नांदगाव शहरातील व्यापारी पेठ येथून चार चाकी गाडी गांधी चौकात जाऊ शकत नाही किंवा गांधी चौकातून व्यापारी पेठेत चार चाकी गाडी घेऊ शकत नाही तर अग्निशामन दलाचा प्रश्नच उरत नाही ही एक अतिशय गंभीर बाब आहे.
​सुरक्षेचा प्रश्न: जर उद्या शहरात मोठी आग लागली किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका पोहोचू शकणार नाही ?.
हे केवळ चोरीपुरते मर्यादित नसून लोकांच्या जीवाशी संबंधित प्रश्न आहे.
बडोदा बँकेमध्ये चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न असफल झाला असला तरी बडोदा बँकेतील कर्मचारी शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे काही गर्दीत सेंटर लॉक करण्याचे देखील विसरून गेले होते हे पोलिसांचे निदर्शनास आले.
.​अतिक्रमण हटाव मोहीम: नगरपालिकेने आणिस्थानिक प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे.​गस्त वाढवणे: पोलीस गाडी जाऊ शकत नसलेल्या अरुंद गल्ल्यांमध्ये ‘दुचाकी’ (Motorcycle) पेट्रोलिंग वाढवणे फायदेशीर ठरेल.​CCTV नेटवर्क: सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्यांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल.​
ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. वेळीच रस्ते रुंदीकरण आणि नियोजित विकास न झाल्यास भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!