दिवसाढवळ्या लूट; २७ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या हिसकावल्या
दिवसाढवळ्या लूट; २७ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या हिसकावल्या
वेगवान मराठी : मारूती जगधने
दि . १७ फेब्रुवारीला २०२६
नांदगाव : ज्येष्ठ नागरिकाला भुयारी मार्ग खाली गाठून दोघा भामट्यांनी 27 तोळे सोन्याच्या अंगठ्या लुबाडल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे यामुळे शहरातील चोरीचा व ज्येष्ठ नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
शहरात दिवसाढवळ्या वृद्धाला लक्ष्य करत दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येत चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
मल्हारवाडी, नांदगाव येथील रहिवासी रमेश एकनाथ पेंढारकर (वय ७१, सेवानिवृत्त)मोपेड गाडी वर भाजीपाला खरेदी करून मल्हारवाडी येथे घरी जात होते .यावेळी दोन भामट्यांनी त्यांची भुयारी पुलाखाली मोपेड गाडी आणून त्यांना चाकूचा धाक दाखवून अंगावरील अंगठ्या बळजबरीने हिसकवल्या .
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता नांदगाव ते येवला रोडवरील नांदगाव रेल्वेच्या भुयारी मार्गाखालील रस्त्याने जात असताना ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील चार सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने हिसकावून नेल्या.
या चार अंगठ्यांचे एकूण वजन सुमारे २७ ग्रॅम असून सध्याच्या बाजारभावानुसार त्यांची किंमत अंदाजे साडेचार लाख रुपये इतकी आहे. फिर्यादीकडून एकूण १ लाख ६५ हजार रुपयांच्या किमतीच्या अंगठ्या लुटण्यात आल्याची नोंद तक्रारीत आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोहवा/२४३२ दिलीप निकम यांनी तक्रार नोंदवून घेतली असून पीएसआय संतोष बहाकर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली; मात्र आरोपी मिळून आले नाहीत. दिवसाढवळ्या ७१ वर्षीय वृद्धाला लक्ष्य करून झालेल्या या लुटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



