नांदगाव शहरात दुचाकी चोरीचा अयशस्वी प्रयत्न
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि15 फेब्रुवारी 2026
नांदगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांच्या चोरी गेलेल्या वाहनांचा शोध सुरु असताना च घटना सुरू असतानाच, शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला (१४ फेब्रुवारी) मध्यरात्री १.०० ते ३.३० या वेळेत रामेश्वर कॉलनी–श्रीराम नगर नांदगांव परिसरात दुचाकी चोरीचा अयशस्वी प्रयत्न घडला.
या घटनेत Honda Shine (क्रमांक: MH20 FR 7478) आणि Honda Unicorn या दोन लोकप्रिय दुचाकींचा समावेश आहे.
घटनेचा सविस्तर आढावा:
आरोपींनी प्रथम नितीन थोरात यांच्या घरासमोर उभी असलेली Honda Shine लाकडी दांडके च्या साह्याने उचलून बाजूला नेली व तिचे हँडल लॉक तोडले.
मात्र गाडी सुरू न झाल्याने ती विश्वनाथ पाटील यांच्या घरासमोर सोडून देण्यात आली.
त्यानंतर आरोपींनी विश्वनाथ पाटील यांची Honda Unicorn दुचाकी घेऊन कवडे यांच्या मळ्यापर्यंत नेली.
तेथे परिसर निर्जन असल्याने व कुत्र्यांचा हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आरोपींनी ती गाडीही झाडीझुडपात टाकून पळ काढला.
सध्याची स्थिती:
दोन्ही दुचाकी रस्त्याच्या कडेला/निर्जन जागी अर्धवट अवस्थेत आढळून आल्या.
Honda Shine ची नंबर प्लेट शाबूत असल्याने वाहनाची ओळख पटवणे सोपे झाले.
दोन्ही गाड्या अखेरीस त्यांच्या मूळ मालकांना परत मिळाल्या.
या घटनेबाबत पोलिसांना मौखिक माहिती देण्यात आली असून, शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी चोरी गेलेल्या वाहनांचा तपास अद्याप पूर्णपणे लागलेला नसल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
नागरिकांना आवाहन:
वाहनांना दुहेरी लॉक लावावे.
शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
मध्यरात्री वाहन सुरक्षित ठिकाणीच पार्क करावे.
नांदगाव परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान तालुक्यातील भौरी येथील काही नागरिकांनी दुचाकी बुलेट खरेदी केल्या होत्या मात्रत्या दुचाकी बुलेट चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर येवला पोलिसांनी त्या गाड्या ताब्यात घेऊन नागरिकांना चांगला अटका दिला त्यामुळे तालुक्यात व अन्य तर ठिकाणी चोरीची वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर आणि चोरट्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत .



