
यश निवड
वेगवान मराठी ! : मारुती जगधने
दि १३ जानेवारी २०२६
साकोरा (ता. नांदगाव) :
साकोरा ता. नांदगाव येथील यशवंत विकास सोसायटीच्या चेअरमनपदी संजय कृष्णा सुरसे तर व्हाइस चेअरमनपदी संजय भावराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी साकोरा ग्रामपंचायतीचे सरपंच अतूल पाटील, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अमित बोरसे पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश बोरसे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सतीश बोरसे, संजय अहिरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव लक्ष्मण जाधव, माजी चेअरमन प्रल्हाद बोरसे, रमेश बोरसे, योगेश बोरसे, पतीग बोरसे, भारत बोरसे, एस. एल. बोरसे, आनंद बोरसे, रवींद्र बोरसे, वसंत बोरसे, शशिकांत बोरसे, शरद सोनवणे, घनश्याम सुरसे तसेच संस्थेचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.



