नाशिक ग्रामीणनाशिक शहर

  कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

Nantdgaon News

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव येथे शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव | दि . ३ जानेवारी २०२५
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे श्री शनेश्वर शेतकरी खरेदी विक्री संघ  वतीने  मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आज संपन्न झाला. या खरेदी केंद्राचे उद्घाटन नांदगाव–मनमाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. सुहास (अण्णा) कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिलदादा आहेर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ, व्यापारी बांधव, हमाल संघटना तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बाजार समितीमध्ये आतापर्यंत काँक्रिटीकरणाचे सुमारे एक कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून भाजीपाला शेडची दुरुस्तीही करण्यात आली आहे. मात्र मका खरेदीसाठी स्वतंत्र व मोठ्या शेडची आवश्यकता असून याबाबत आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उर्वरित काँक्रिटीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना शेतकरी प्रतिनिधी व हमाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मका खरेदीसाठी लागणारा हमाली खर्च, तोलाई व इतर अनुषंगिक खर्च शेतकऱ्यांवर कमी पडावा, यासाठी या केंद्राचा मोठा फायदा होणार आहे. आमदारांच्या प्रयत्नातून शासकीय गोडाऊन उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे अतिरिक्त खर्च वाचणार असून मका उत्पादनाला प्रतिक्विंटल २४०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी आधारभूत खरेदी केंद्रे उशिरा सुरू होण्याचा मुद्दा उपस्थित करत, ही केंद्रे पुढील वर्षापासून लवकर सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मका व कांदा ही तालुक्यातील प्रमुख पिके असल्याने एकाच संस्थेवर ताण न देता अधिक खरेदी केंद्रे व संस्था वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
आमदार सुहास कांदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नांदगाव मार्केट कमिटी ही शिस्तप्रिय व आदर्श बाजार समिती असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेले सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. मका खरेदीसाठी दर्जेदार शेड, रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाची परवानगी मिळाल्यास आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे जीवन, त्यांची स्वप्ने आणि कष्ट बाजार समितीशी जोडलेले असून शेतकऱ्यांना योग्य भाव व वेळेत पैसे मिळणे हेच आपले ध्येय असल्याचे आमदार कांदे यांनी नमूद केले. कांदा व मका या पिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबतही शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शेतकरी, व्यापारी, पत्रकार बांधव व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून आमदार कांदे यांनी नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी व भरभराटीचे जावे, अशी शनिश्वर चरणी प्रार्थना केली.
यावेळी माजी आमदार अनिल आहेर बाजार समिती संचालक दर्शन आहेत दर्शन आहेतबाजार समितीचे माजी सभापती तेज कवडेमाजी सभापती विलास आहेर जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश बोरसे आदींनी मार्गदर्शनपर आपले मत व्यक्त केले .बाजार समितीचेसंचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .

नांदगांव  कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव येथे शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार सुहास(आण्णा)कांदे यांचे हस्ते करण्यात आले. नांदगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्रा मध्ये मोठ्या प्रमाणात मका विक्री अभावी शेतकरी वर्गाकडे पडून आहे. मका इतिहासात प्रथमच बाजारभावात कमालीची घसरण झालेली आहे. सदर केंद्रा बाबत आमदार सुहास(आण्णा)कांदे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून सदरचे केंद्र मंजूर करून घेतले. त्याचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत नांदगांव बाजार समिती यार्ड़वर करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिलदादा आहेर , माजी जि.प.सदस्य रमूकाका बोरसे , बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर , तेजदादा कवडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शनैश्वर खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलासराव आहेर यांनी केले.
आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की, सदर खरेदी केंद्र वेळेत सुरू करणे बाबत यापुढील काळात शासनाक़डे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच नांदगांव बाजार समितीचे आवारावर भव्य लिलाव शेड तसेच यार्ड कॉंक्रिटीकरण करणे कामी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच ५ कोटी रूपयाचे अद्ययावत शेतकरी भवन बाजार समिती आवारात बांधणे कामी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविलेला असून त्याचे मंजूरीसाठी प्रयत्न केले जातील. असेही त्यांना आपल्या मनोगतातून सांगितले. नांदगांव बाजार समितीही शिस्तप्रिय असले बाबत त्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळाचीही प्रशंसा यावेळी केली.
यावेळी नांदगांव बाजार समितीच्या वतीने नांदगांव व मनमाड येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे , योगेश (बबलू ) पाटील व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नांदगांव नगरपरिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचे सह चेतन पाटील , शिवाजी पाटील , राजाभाऊ जगताप , बाळू आप्पा कांदे , प्रमोद भाबड , बाळकाका कलंत्री , बाजार समितीचे उपसभापती अनिल सोनवणे , संचालक एकनाथ सदगिर , साहेबराव पगार , सतिष बोरसे , पोपट सानप, समाधान पाटील , दिपक मोरे, जीवन गरुड , अनिल वाघ , अमोल नावंदर , अमित बोरसे , निलेश इपर , बाळासाहेब कवडे , सचिव अमोल खैरनार यांचेसह शनैश्वर संघाचे सर्व संचालक , शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे माजी उपसभापती राजाभाऊ देशमुख यांनी केले.
फोटो ओळी – मका फेडरेशन शुभारंभ प्रसंगी प्रथम आलेले शेतकरी दत्तू कांदे यांचा आमदार सुहासआण्णा कांदे यांनी सत्कार केला. यावेळी माजी आमदार अनिलदादा आहेर , बाजार समिती सभापती दर्शन आहेर , शनैश्वर संघाचे चेअरमन विलासराव आहेर , माजी सभापती तेजदादा कवडे आदि.

याप्रसंगी नांदगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील नांदगाव मनमाड येथील नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!