इलेक्टिक मिरीट असणाऱ्या उमेदवारांनाच संधी – माजी खासदार समीर भुजबळ
इलेक्टिक मिरीट असणाऱ्या उमेदवारांनाच संधी - माजी खासदार समीर भुजबळ

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला,दि.७ नोव्हेंबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्टिक मिरीट असणाऱ्या उमेदवारांना सर्वानुमते संधी देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंढरीनाथ थोरे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी सभापती किसनकाका धनगे, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, महिला तालुकाध्यक्षा सुरेखा नागरे, शिवाजी सुपनर, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, प्रकाश वाघ, भागीनाथ पगारे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, विनोद जोशी, भगवान ठोंबरे, नितीन गायकवाड, संजय पगार, सचिन कळमकर, विनायक भोरकडे, अशोक नागरे, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, डॉ.मनिषा पवार, माधव जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अतिशय चांगले वातावरण असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वांनाच संधी देणे शक्य होणार नाही. ज्यांच्याकडे इलेक्टिक मिरीट, दांडगा जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना सर्वानुमते संधी देण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय हा मंत्री छगन भुजबळ साहेब हे घेणार आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळणार नाही त्यांनी निराश न होता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर युती करायची की नाही हा सर्वस्वी निर्णय स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने दिलेला आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती बघून ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कागदपत्रांबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.



