नाशिक ग्रामीण

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष येवल्यात सक्षमपणे लढणार- प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष येवल्यात सक्षमपणे लढणार- प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक :7नोव्हेंबर/ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाची येवल्यात बैठक संपन्न आघाडीस प्राधान्य न झाल्यास स्वबळावर लढणार.
येवला तालुका काँग्रेस कमिटीची बैठक रामगीत लॉन्स, येवला येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजारामजी पानगव्हाणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
यावेळी दक्षिण नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत टाकेकर, पक्ष निरीक्षक व येवला प्रभारी जमीलभाई शेख, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, सचिन होळकर, प्रा. प्रकाश खळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.
यावेळी पानगव्हाणे अध्यक्षीय भाषणातून म्हणाले की या देशाच्या जडणघडणीत काँग्रेस पक्षाचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचे योगदान असून जनता आता भाजपाच्या भूलथापांना व कामकाजाला पूर्णतः कंटाळलेली आहे. शेतीमालाला भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, वाढलेली प्रचंड महागाई तसेच ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे परंतु सरकारने शेतकऱ्याला कोणतीही भरीव मदत केली नाही.
तसेच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येवल्यात काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यास प्राधान्य देईल परंतु आघाडी झाली नाही तर काँग्रेस पक्ष स्वबळावर नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सक्षमपणे लढेल व जिंकेल असा विश्वास व्यक्त केल्या.
जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर आपल्या मनोगतात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला पुन्हा गत वैभव प्राप्त होईल व येवला तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेस पक्षाची उभारणी केलेली असून त्या कामाच्या जोरावर नगरपालिकेत व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला जाईल.
पक्ष निरीक्षक व येवला प्रभारी यांनी येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या अहवाल व आढावा घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी महत्वपूर्ण अशा सूचना करून बुथ कमिट्या या भक्कम करण्यास प्राधान्य द्यावे अशा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना सूचना केल्या. तसेच प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांनी निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात ॲड. समीर देशमुख यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या कामाचा आढावा केलेली आंदोलन, सामाजिक उपक्रम, बूथ कमिट्या, सभासद नोंदणी, गट, गण व नगरपालिकेची रचना यांचा अहवाल सादर केला व काँग्रेस पक्ष निवडणूक किला सक्षमपणे सामोरे जाईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रा.अर्जुन कोकाटे, ॲड. दिलीप कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष प्रीतम पटणी, प्रा. प्रकाश खळे, डॉ. मसरतअली शहा, शहराध्यक्ष मंगल परदेशी, अशोक भागवत, ज्ञानेश्वर मढवई, नाना पिंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन नानासाहेब शिंदे यांनी केले व आभार विलास नागरे यांनी मानले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अरुण आहेर, राजेश भंडारी, बळीराम शिंदे, भगवान चित्ते, तात्या लहरे, उस्मान शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष नाना शिंदे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश सोमासे, चांगदेव खैरे, माधव सोळसे, माजी मुख्याध्यापक दिनकर दाणे, दिलीप तक्ते, बाळासाहेब सोनवणे, गणपत शिंदे, सुखदेव मढवई, विलास नागरे, भाऊसाहेब दाभाडे, बाबासाहेब शिंदे, मारुती सोमासे, खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रताप दाभाडे, उमेश कांदलकर, अर्जुन गायकवाड, भाऊसाहेब दाभाडे, सलीम देशमुख, अमित पटणी, ॲड. अमोल पगारे, जरार पैलवान, विजय दाभाडे, दयानंद बेंडके, सुरेश मढवई, राकेश चंद्रटिके, विकास वाघमोडे, रफिक शेख, शांताराम गुंजाळ, दीपक मढे, डॉ. नीलम पटणी, सतीश पुणेकर, शिवनाथ खोकले, गणेश डिकले, गणेश भोरकडे, मुकेश पाटोदकर, प्रकाश बोरजे, किरण भोरकडे, रोहन बिडवे, भिवनाथ बोरजे, समाधान पडवळ, रोहन दिवे, शिवाजी निमसे, सुभाष खोकले, शांताराम गुंजाळ, विलास दाभाडे, मुसा शेख, दीपक साळवे, मच्छिंद्र गुडघे, भानुदास मढवई, शिवाजी खापरे, विजय भोरकडे, विवेक चव्हाण, कमलेश दाभाडे, राजेंद्र घोटेकर, नवनाथ भोरकडे, पप्पू वाघ, संदीप धिवर, दत्तू खोकले, किरण भोरकडे, प्रदीप पाटील, गुणाजी भाटे, दीपक दाभाडे, अनिकेत पडवळ, रोनक निकाळे, शिवेंद्रादित्य, देशमुख, संजय मोहन, रामेश्वर ठाकरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!