
“ड्रायव्हिंग करते वेळी तुमचा कॉल मलाही लागू शकतो “
सुरक्षित वाहनचालना (Driving Safety) विषयी जागरूकता निर्माण करणारे एक विनोदी पण मार्मिक कार्टून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कार्टून मोबाईल फोन वापरत वाहन चालवणाऱ्यांना थेट चेतावणी देत गंभीर संदेश पोहोचवते.
सध्या स्थितीत असलेल्या परिस्थितीवर दुचाकी स्वार कशा पद्धतीने मोबाईलवर बोलत दुचाकी चालवतो यातलं हे बोलकं कार्टून आज जनतेसमोर आलेला आहे अत्यंत मार्ग आहे यातून बोध घेण्यासारखा देखील आहे अन्यथा यम राजाला आमंत्रण गेल्याचे अनेक प्रकार यापूर्वी अपघातात घडलेले आहे पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे कार्टून एका जाणकार व्यक्तीने प्रसिद्ध केलेला आहे त्याचे नाव मात्र कळालेले नाही एक माणूस स्कूटरवर बसून एका हाताने हँडल पकडलेला आणि दुसऱ्या हाताने मोबाईलवर बोलत असल्याचे दाखवले आहे. त्याच्या चेहऱ्यावर घाई आणि तणावाचे भाव स्पष्टपणे दिसतात. बाजूलाच धावणारी पिवळी बस धोका अधिक वाढवते, तर पार्श्वभूमीवर मोबाईल नेटवर्कचा टॉवर सिग्नल पाठवत असल्याचे दृश्य लक्षवेधी आहे.
वरच्या उजव्या कोपऱ्यात यमराज रागाने त्या चालकाकडे पाहत उभे आहेत. हातात गदा, डोक्यावर मुकुट आणि गळ्यात माळा — त्यांच्या मुद्रेत इशारा आणि रोष दोन्ही आहेत. त्यांचा संवाद हिंदीत असा आहे – “मूर्ख मानवा, ड्रायव्हिंग करते वेळी, तुमचा कॉल मलाही लागू शकतो.”
या वाक्यातून गाडी चालवताना मोबाईल वापरण्यामुळे मृत्यू ओढवू शकतो, असा स्पष्ट संदेश दिला आहे. कार्टूनमध्ये डाव्या बाजूस ‘हसून अश्रू ढाळणारा इमोजी’ दाखवून या गंभीर संदेशाला हलकं विनोदी (Dark Humour) वळण दिलं आहे.
हे कार्टून केवळ हास्यनिर्मिती करत नाही, तर प्रत्येक वाहनचालकाला जबाबदारीची जाणीव करून देते. “मोबाईलवर बोलायचेच असेल, तर वाहन थांबवा — जीव दावणीला लावू नका,” असा अप्रत्यक्ष पण ठळक इशारा हे चित्र देत आहे.



