‘ये गं कळी अन् बस पाठगुळी’; खुन्नस लागेल असे स्टेटस ठेवल्याने तिघांकडून मारहाण

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ :- लासलगावच्या टिळकरोड परिसरात सामाजिक माध्यमावर ठेवलेल्या स्टेटस वरून चुलत भावांमध्ये वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गणेश रणछोडदास कायस्थ (वय ४२, रा. मुंढे गल्ली, टिळकरोड यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी संजय हरिभाऊ कायस्थ, केदू संजय कायस्थ व कृष्णा संजय कायस्थ, सर्व रा.डांगे गिरणीच्या पाठीमागे, लासलगाव हे हे सर्व आपापसांत नात्याने चुलत भाऊ व पुतणे आहेत. दि. ४ नोव्हें २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कृष्णा पाववडा दुकाना समोर, बाजारतळ रोड येथे फिर्यादी आणि त्यांचा भाचा कृष्णा शंकर कायस्थ हे गप्पा मारत असताना आरोपी संजय कायस्थ याने भाच्याला फोन करून, ‘ तु मोबाईलवर खुन्नस लागेल असे स्टेटस का ठेवतोस?’ असा जाब विचारला. त्यानंतर आरोपी तिघेही दुकानाजवळ आले व त्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. आरोपी संजय कायस्थ याने दुकानाजवळ पडलेला फायटर उचलून फिर्यादी व त्यांचा भाचा कृष्णा यांच्या डोक्यावर मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले. ‘ आमच्या नादी लागला तर एकेकाचा बेत पाहू’ अशी धमकीही आरोपींनी दिली. त्यांच्या या फिर्यादीवरून सदर आरोपींच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात भा.दं.सं.११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.संदीप निचळ अधिक तपास करीत आहेत.



