
वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक: 30 :ऑक्टोबर/संपूर्ण सातबारा कोरा,हमीभावावर २०%अनुदान,सोयाबीन, कांदा, कापूस यासह सर्वच शेतमालाला योग्य भाव,मेंढपाळ, मच्छिमार, ग्रामपंचायत कर्मचारी या मागण्या घेऊन माजी राज्य मंत्री बच्चू कडू,माजी आमदार,वामनराव चटप,माजी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर,अजित नवले या प्रमुख शेतकरी नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसह नागपुरात महाएल्गार मोर्चा चे आयोजन केले असून
मागण्या मान्य होत नाही तोवर मागे हटणार नाही हा निर्धार केला असल्याने सरकार पुढील समस्या वाढल्या आहेत
सर्व प्रयत्न करूनही आंदोलक माघार घेत नसल्याच बघून अखेर सरकारने आंदोलक नेत्यांना मुबई त चर्चेच निमंत्रण दिल्याने आज सायंकाळी सहा वाजता निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे
आंदोलक आंदोलनावर ठाम असून आज सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उद्या पासून नागपुरात रेलरोको सह राज्यभर चक्का जाम आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला आहे
या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील शेतकरी संघटना,रिपब्लिकन पक्ष, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट)यांनी पाठींबा देत आंदोलनास जाहीर करत तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून सरकारने लवकर योग्य निर्णय घ्यावा अन्यथा सर्व पक्ष संघटना आंदोलनात उतरतील असा इशारा देण्यात आला
या वेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते संतु पाटील झांबरे,बापूसाहेब पगारे,संध्याताई पगारे व त्यांचे सर्व कार्यकर्ते, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ महाजन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण चरमळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ संकेत शिंदे,शहर अध्यक्ष योगेश सोनवणे,रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते
————————फडणवीस सरकारने कबूल केल्याप्रमाणे संपूर्ण सातबारा कोरा करावा,अतिवृष्टी चे जाहीर केलेले अनुदान तातडीने वितरित करावे,मेंढपाळ, मच्छिमार, दिव्यांग,ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावे अन्यथा उद्यापासून तालुक्यासह राज्यात शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारला बघायला मिळेल
हरीभाऊ महाजन
तालुकाध्यक्ष
प्रहार शेतकरी संघटना येवला



