स्वार्थासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना वेड्यात काढू नका- बाबा डमाळे पाटील
स्वार्थासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना वेड्यात काढू नका- बाबा डमाळे पाटील

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला: 29: ऑक्टोबर /कार्यकर्त्यांच्या बळावर केंद्रात मंत्री,खासदार,राज्यात आमदार मंत्री व्हायचं मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व्हायचं याकरिता तत्व व पक्षनिष्ठ सोडून अभद्र युत्या करायच्या आघाड्या करायच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कार्यकर्त्यांना सांगायचं स्वबळावर निवडणूक लढवा याला कोणती नीती पक्षनिष्ठा म्हणायची असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य,, सामाजिक कार्यकर्ते बाबा डमाळे पाटील यांनी सर्वच वरिष्ठ पक्षश्रेष्ठींना केला आहे.
तुम्हाला मोठे पदे भोगण्यासाठी कार्यकर्त्यांचा मरमर काम करून घेतात, वापर करून घेतात. जातीपातीचा वापर करतात,स्थानिक कार्यकर्ते पक्षाकरिता भांडणे,हाणामाऱ्या अनेक गुन्हे स्वतःवर घेतात
यावेळी कोणचाही वरिष्ठ नेता किंवा सत्तेत असलेला ही देखील पक्ष लक्ष देत नाही.
कार्यकर्त्यांना मारणे घालतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था पदावर स्वतंत्र लढा म्हणतात, हे निर्लज्जपणाचे लक्षण नाही का?असा सवाल बाबा डमाळे पाटील यांनी सर्वच नेत्यांना पत्र पाठवून केला आहे.
तुम्हीच म्हणजे पक्ष आहेत का ?पक्षाचे कार्यकर्ते कोणीच नाही का ?आम्ही गाव पातळीवरती तालुका पातळीवरती काय काम करतो याचा लेखाजोखा तुमच्याकडे असतो का?पक्षाची निष्ठा आम्ही बाळगतो मात्र तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतात, यावेळी आपण कार्यकर्त्यांचा विचार किंवा विचारात घेतात काय?
याचा विचार कधी केला.हिंदुस्थानात इंग्रजांची हुकूमशाही पद्धत तुमच्यापेक्षा चांगली होती,अशी म्हणण्याची वेळ आली आहे असे समजायचे काय?
गाव गाड्यात नातीगोती सोडून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाची तुम्ही चेष्टा करता आणि उपऱ्या व बाहेरून आलेल्या लोकांना मान सन्मानाने तुम्ही पाय घड्या घालतात मात्र ज्यांनी कष्ट केले त्या कार्यकर्त्यांची तुम्हाला कदर नाही.
तुम्ही स्वार्थासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान देत नाहीत म्हणजे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते वेडे किंवा मूर्ख आहेत काय ?
आमचा वापर करून घ्यायचा पुन्हा इंग्रज लागवड लागू करू नका सामान्य कार्यकर्त्यांना वेड्यात काढू नका ही सर्वच पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांची खदखद आहे असे शेवटी बाबा डमाळे पाटील यांनी सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती केली आहे.



