सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या पतीसह सासरा अटकेत.

गर्भवती महिलेची आत्महत्या; सासरच्या त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पतीसह स सासरे अटक
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.२८सप्टेंबर २०२५:-
बागलाण तालुक्यातील आराई येथील सासरच्या छळाला कंटाळून एका गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे .यामुळे एकच खळबळ माजली आहे. सटाणा तालुक्यातील कोकणीपाडा वस्तीतील १९ वर्षीय गर्भवती वैशाली हिने नदीपात्रात उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली. यासंदर्भात सटाणा पोलिसांनी आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्या पतीसह सासू-सासरे यांना अटक केली आहे.
प्रकरणाची माहिती अशी आहे की, काल दुपारच्या सुमारास कोकणीपाडा वस्तीतील लहान मुले खेळत असताना त्यांना नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी वस्तीतील रहिवाशांना ही घटना सांगितली असता त्यांनी नदीपात्राकडे धावले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तातडीने सटाणा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वैशालीला आणि तिच्या गर्भाला मृत घोषित केले सुरुवातीला या घटनेला नदीत बुडून मृत्यू झाल्याचे समजले, परंतु पुढील तपासात केला असता वैशालीला सासरच्या त्रासामुळे आत्महत्या करण्याची मानसिक स्थिती आली होती. सटाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक योगेश पाटील आणि उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आली.
मयत महिलेवर तिच्या माहेरी तिळवण येथील शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सटाणा पोलिसांचे अधिकारी पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खांडेकर, विशाल जाधव, आणि पोलिस पाटील कारभारी भदाने अधिक तपास करीत आहेत.



