सत्यशोधक व सहकार क्षेत्रातील क्रांतिकारक नेते स्व. वामनराव (आप्पा) गोविंदराव पाटील यांची ११८ वी जयंती
Nandgaon news
सत्यशोधक व सहकार क्षेत्रातील क्रांतिकारक नेते
स्व. वामनराव (आप्पा) गोविंदराव पाटील यांची ११८ वी जयंती
वेगवान मराठी : मारूती जगधने
नांदगांव :
[दि. 27 सप्टेंबर 2025 ]
साकोरा, ता. नांदगाव – देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा उचलत सहकार व निमसहकारी क्षेत्राला नवे दिशा देणारे सत्यशोधक नेते स्व. वामनराव (आप्पा) गोविंदराव पाटील यांची ( २८ सप्टेंबर) रोजी ११८ वी जयंती आदरपूर्वक साजरी करण्यात येत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकारी व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते.
सहकार क्षेत्रातील थोर योगदान
स्व. पाटील यांनी नाशिक जिल्हा तसेच राज्यभरातील सहकार क्षेत्राला नवे परिमाण दिले. त्यांनी भूषविलेली विविध पदे त्यांच्या कार्याचा ठसा उमटवणारी ठरली –
- नाशिक जिल्हा देखरेख संघाचे मा. अध्यक्ष व संचालक
- रेल्वे बोर्ड, मुंबईचे संचालक
- नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे कायम संचालक
- नाफेड, नवी दिल्लीचे संचालक
- जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक
- नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे महाराष्ट्रातील पहिले सभापती
याशिवाय माजी पंतप्रधान स्व. मोरारजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मराठवाड्यातील सहकार सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले.
समाजहितासाठी उपक्रम
शिक्षण व समाज upliftment याबाबतही स्व. पाटील यांनी मोठे योगदान दिले. रयत शिक्षण संस्था, सातारा येथे ते स्थानिक सल्लागार होते.
नाशिक व जळगाव परिसराला जीवनदायी ठरलेल्या गिरणा व नाग्यासाक्या धरणाच्या निर्मितीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
, कै. वामराव (आप्पा) गोविंदराव पाटील हे एक दूरदृष्टीचे आणि लोककल्याणकारी नेते होते ज्यांनी सहकार आणि शिक्षणाच्या माध्यमातून नांदगाव तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण जीवनात मोठे परिवर्तन घडवले. आजही त्यांचे कार्य आणि विचार लोकांना प्रेरणा देत आहेत
सत्यशोधक विचारांचे पालन
क्रांतिकारक स्व. आप्पा पाटील यांनी सत्यशोधक तत्त्वांचा पुरस्कार केला. समाजातील वंचित घटकांना संघटित करून त्यांना सहकाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा त्यांचा ध्यास होता.
वारसा आणि स्मृती
स्व. वामनराव ( आप्पा )पाटील हे क्रांतिकारक नेत्या स्व. लीलाताई उत्तमराव पाटील यांचे वडील होते. आज त्यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त साकोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.



