या शहरात पंचक्रोशीमध्ये सुमारे दोन तासांचा धुवांधार पाऊस
२५ ते ३० मिमीपेक्षा जास्त पर्जन्यमान; अनेक गावांत शेतात पाणी साचले
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव [, दि. 27 सप्टेंबर 2025 ]–
नांदगाव शहर व पंचक्रोशी परिसरात आज सायं. 5 ते 7 या दोन तासांत मुसळधार पाऊस झाला. पर्जन्यमानाचा अंदाज स्थानिक हवामान विभागाने २० ते २५ मिमीपेक्षा जास्त अंदाजअसून काही भागात यापेक्षा अधिक पाऊस झाला असण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक तडाखा बसलेली गावे
या पावसाचा तडाखा विशेषतः अंदाजे मनमाड, जातेगाव, वाखारी, हिवसळ बु.,, तळवाडे, श्रीराम नगर ,फुलेनगर ,क्रांतीनगर ,गिरणा नगर ,नांदगाव शहर ,गंगाधरी, बानगाव , हिसवा ळ, कोंढार वाखरी, हिंगणवाडी पिंप्राळे या गावांना बसला. काही ठिकाणी घरांच्या ओट्यावर व शेतातील बांधावर पाणी ओसंडून वाहिले. नांदगाव शहरातील खालच्या भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले.अनेक घरांमध्ये बंद काचाच्या खिडक्यांमधून पाणी संपूर्ण घरात पाणी साचले होते .नांदगाव शहराच्या दक्षिण दिशेकडून आणि दक्षिण उत्तर दिशेकडून देखील प्रचंड पाऊस होता
नदी-नाल्यांना पूरस्थितीचा धोका
अचानक वाढलेल्या पावसामुळे स्थानिक नाले, ओढे व लहान धरणे तुडुंब भरली. प्रशासनाने नागरिकांना पूरप्रवण भागात जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांची चिंता
उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये हवालदिल वातावरण आहे. विशेषतःखरिपाची पिके वाया जाण्याची शक्यता असून रब्बी पिकांची लागवड धोक्यात आली असून, पाणी लवकर न ओसरल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रात्री सव्वा आठ वाजे पासून पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले होते -रात्री उशिरापर्यंत पावसाची शक्यता होती
प्रशासनाच्या आपत्कालीन उपाययोजना
- महसूल विभागाने प्राथमिक पाहणी सुरू केली असून पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
- कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीची कामे करण्याचे आवाहन केले आहे.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तहसीलदार ,नगरपालिका ग्रामपालिका या कार्यालयाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.



