या शहरातील गणेश मूर्ती विक्रीला मोठी मागणी – किंमती दुप्पट वाढल्याने लहान मूर्तींना अधिक पसंती
Nandgaon News
या शहरातील गणेश मूर्ती विक्रीला मोठी मागणी – किंमती दुप्पट वाढल्याने लहान मूर्तींना अधिक पसंती
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. 27 ऑगस्ट –
शहरात गणेश स्थापनेसाठी गणेश मूर्ती विक्रीला मोठ्या प्रमाणात आल्या असून यंदा मूर्तींच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किंमती वाढल्यामुळे विक्रेत्यांनी केवळ ५० टक्केच मूर्तींचा माल खरेदी केला आहे.
ग्राहक मात्र उत्साहात असून विक्री केंद्रांवर बरीच झुंबड उडालेली दिसून आली. मोठ्या मूर्तींपेक्षा लहान आकाराच्या मूर्तींना ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. वाढत्या किमतींमुळे अनेकांनी मोठ्या मूर्तीऐवजी किफायतशीर व लहान मूर्ती खरेदी करण्याकडे कल दर्शवला आहे.
विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक खर्च, रंगकाम व साहित्य दरवाढ यामुळे मूर्तींच्या किंमती वाढल्या आहेत. तरीसुद्धा भक्तिभावाने गणेश खरेदीसाठी नागरिक मोठ्या उत्साहाने गर्दी करत आहेत.
एकूणच यंदा नांदगाव शहरात किंमती वाढल्या असल्या तरी गणेशभक्तीची उधळण कायम राहिल्याचे चित्र दिसत आहे.



