
वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :10ऑगस्ट :येवला तालुक्यातील सायगाव येथे ‘यश पेट्रोलियम’ या नवा पेट्रोल पंपाचा भव्य शुभारंभ सोहळा सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन गुरुवर्य पं.पू. मठाधीपती स्वामी रमेशगिरीजी महाराज (समाधी स्थान – जनार्दन स्वामी, बेट कोपरगाव) यांच्या शुभहस्ते होणार असून, या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या मंगलप्रसंगी सर्व सायगाव व परिसरातील ग्रामस्थ तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री अंबादास सैंदर परिवार यांनी केले आहे.



