तापमान वाढत आहे आणि अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज.. युवा जिल्हाध्यक्ष तुषार अहिरे
तापमान वाढत आहे आणि अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज.. युवा जिल्हाध्यक्ष तुषार अहिरे

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक:१७ जुलै 2024 /वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, कारण त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येतो आणि पर्यावरणाचा समतोल राखता येतो.
वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होत आहे. तापमान वाढत आहे आणि अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असे प्रतिपादन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार अहिरे यांनी केले
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनकाई येथे बुधवारी ता. १६ वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
अनकाई येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तुषार अहिरे यांनी अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
किल्ल्याच्या पायथ्याशी छोटे बाबा आश्रम परिसरात वृक्ष रोपे लावण्यात आली.
मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू निकटवर्तीय दिपक केदारे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक धिवर,सामाजिक कार्यकर्ते गणेश येळींजे, अनकाई येथिल छोटे बाबा आश्रमातील पद्म दास महाराज,डॉ. सुधीर जाधव , राहुल अहिरे,विकास अहिरे, जितेंद्र गायकवाड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रविन्द्र करमासे,उपाध्यक्ष सुदर्शन खिल्लारे,माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुगे, सरचिटणीस भाऊलाल कुडके,खजिनदार राजेंद्र शेलार, पत्रकार राजेंद्र परदेशी,संतोष घोडेराव,सुदाम गाडेकर,प्रमोद पाटील, विलास कांबळे,दिपक सोनवणे,एकनाथ भालेराव सचिन वाखारे,देवराम कदम, अनिल अलगट,दिपक ढोकळे,,मुकुंद अहिरे,अनिल जाधव,प्रविण खैरनार आदी पत्रकार बांधव व ग्रामस्थ वृक्ष रोपण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते तुषार अहिरे यांच्या तर्फे उपस्थितांना वृक्ष रोपे भेट स्वरुपात देण्यात आली.



