या तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात दाखल.
या तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात दाखल.

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
नाशिक ता. १५ जुलै /तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येत आहे. त्याच गतीने पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू आहे.
तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी तसेच मोठ्या ग्रामपंचायत मधील अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक चेअरमन यांचे आज मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्यातील हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आमदार व जिल्हाप्रमुख सुहास कांदे शिवसेना सचिव संपर्क नेते भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने व येथील तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे.
शिवसेना शिंदे गटाची ताकद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यात या अनेक सरपंच व विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर मोठी भर पडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी हे प्रवेश सोहळे होत असल्याचं तालुकाप्रमुख शेळके पाटील यांनी सांगितलं
या प्रवेश सोहळ्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे निश्चितपणाने पक्षाची ताकद वाढेल असा अंदाज तालुका शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.तसेच प्रत्येक गटामध्ये,गणामध्ये ताकतीचे उमेदवार देऊन निवडून आणण्याचा मानस येथील शिवसैनिकांनी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे या प्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रवेश सोहळ्यामध्ये आडगाव येथील सरपंच रामकृष्ण खोकले, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष व विद्यमान उपसरपंच बाभूळगाव शरद बोरणारे श्रावण ठोंबरे,कल्पना ठोंबरे सरपंच पुरणगाव, लाल सेनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र गायकवाड,सुनिता जाधव सरपंच नांदेसर,शिवाजी खोकले, माजी सरपंच, देविदास चव्हाण उपसरपंच कोळम,सुनिल सोनवणे उपसरपंच,पंडित खकाळे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी पुरणगाव,संतोष रोठे माजी उपसरपंच डोंगरगाव,गणेश कोटमे ग्रामपंचायत सदस्य कोटमगाव, गीता पोटे ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव, रत्नाबाई पोटे सदस्य विविध कार्यकारी सोसायटी सदस्य पिंपळगाव,चेतन कदम ग्रामपंचायत सदस्य कोळम.
या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील,शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे,युवा सेनेचे तालुकाप्रमुख अभिजीत डुकरे अभिजीत शिंदे उपतालुकाप्रमुख शरद कुदळ युवा सेनेचे तालुकाप्रमुख यश जगताप यांच्या सह या प्रवेशासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.



