या शहरात रस्त्यावर खड्डेच खड्डे … एका राजकीय पक्षाने लावली भर रस्त्यात झाडं –!
सिन्नर शहरात रस्त्यावर खड्डे का ? खड्ड्यात रस्ते.,. मनसे ने लावली भर रस्त्यात झाडं

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. 15 जुलै 2025 — दर वर्षी प्रमाणे यंदाही सिन्नर शहरातील व उप नगरातील रस्त्याची चाळण झाली असून पावसाळ्यापुर्वी केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे यांचाच निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार (दि. १४) रोजी खासदार पूल ते आडवा फाटा भैरवनाथ मंदिर ते खासदार पूल अजिंकतारा ते आडवा फाटा, शिवाजी नगर ते बस स्टॅन्ड झापवाडी ते सिन्नर अशा सिन्नर शहराच्या चहू बाजूने रस्त्याचे जाळे झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्याच्या खड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले तसेच निकृष्ट दर्जाचे रस्ते याबद्दल प्रशासनाच निषेध करण्यात आला.
जोरदार पावसाने शहरातील सर्वच रस्त्यानची प्रचंड दुर्दशा झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अनेकांना मणक्याचे त्रास उद्भवत आहे तर काहींना जीव गमवावा लागत आहे. प्रसासनाने पावसाळ्यापुर्वी बहुतेक रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र पावसामुळे रस्त्यावरील डाबर वाहून गेले. जागोजागी खड्डेच खड्डे दिसत आहे त्याचाच निषेध नोंदवण्या करता मनसेच्या वतीने सिन्नरमधील सर्वच भागामध्ये रस्त्यावरील खड्यात वृक्षरोपण करून आंदोलन करत निषेध केला.
साध्य पावसाने उघड घेतल्याने सर्वच रस्त्याचे तातडीने काम व दुरुस्ती करावी अन्यथा प्रशासणाच्या विरोधात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला त्या प्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष रामदास खैरनार, जिल्हा उप प्रमुख अमोल जाधव, शहर अध्यक्ष गणेश मूत्रक, भिवाजी शिंदे, लखन खर्डे, सागर वाकचौरे, विकास लोंढे, प्रताप डावरे, भगवान आव्हाड, महेश शाहकर, वैभव सिरसाट,वैभव जगताप, शिवराज ढिकणे हे सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नरच्या वतीने शहरातील खड्ड्याविरोधात आंदोलन करण्यात आले अति प्रमाणात खड्डे पडलेले असतानां अधिकारी वर्ग डोळेझाक करत कसं याबद्दल एक छोटंसं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले ही फक्त एक छोटी झलक होती जर सिन्नरमधील असलेले खड्डे बुजवले नाही तर अतितीव्र आंदोलन करण्यात येईल यां प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जाधव, तालुकाअध्यक्ष रामदास खैरनार, शहरअध्यक्ष गणेश मुत्रक, शहर उपाध्यक्ष भिवाजी शिंदे, शहर सरचिटणीस लखन खर्डे, भगवान आव्हाड, सागर वाघचौरे, वैभव शिरसाठ, विकास लोंढे, डावरे, महेश शहाकर आदी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



