चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून धमकावत सशस्त्र दरोडा
चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून धमकावत सशस्त्र दरोडा

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला :दिनांक 4 मे / तालुक्यातील कोळम येथील आवारे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवीत महिलांना बेदम मारहाण केली.
त्यांनी चार वर्षांच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेवत धमकी दिली आणि घरातील सोन्याचे दागिने असा सुमारे ७१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले आहे.
याप्रकरणी येवला तालुका पोलिसांत तीन अनोळखी दरोडेखोरांविरोधात भारतीय न्याय संहिता ३०५, ३३१ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, तालुका पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात भालचंद देवराम आवारे, सुनीता भालचंद आवारे, चित्रा बापू आवारे हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येवला येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
……………………………….
कोळम येथील आवारे वस्तीवर चार-पाच चोरट्यांनी जबरी चोरी करीत कुटुंबातील महिलांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेतील चोरट्यांना शोधून ताब्यात घेण्यात येईल.
संदीप मंडलिक, पोलिस निरीक्षक,
येवला तालुका
फिर्यादीनुसार पत्नी चित्रा, मुलगी विद्या, असे तिघे गच्चीवर झोपलेले होते, तर आई सुनीता, वडील भालचंद आवारे झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी दरोडेखोरांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून आई व पत्नी यांच्या अंगावरील दागिने व घरातील कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये असा एकूण ७१ हजार रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये