
वेगवान नेटवर्क
नवी दिल्ली, ता. 28 एप्रिल 2025 – Gold prices fell sharply today -सोनं-चांदी चे भाव रोज कमी जास्त होत असतात. मात्र याच भावावर सर्वांची नजर असते. सोनं एक दागिना नसून भविष्यातील गुंतवणूक आहे. सोनं खरेदी करुन लोक यामध्ये मोठी गुंतवणूक करतांना दिसून येत आहे. अक्षय तृतीय तोंडावर आली असतांना सोन्याचे भाव सलग पाचवा दिवशीपण घसरले आहे.
भारताचा विचार केला तर अनेक शहरामध्ये सोन्याचे दर कसे राहिले हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जर सोन्याचे अपडेट हवे असेल तर तुम्ही खालील माहिती जाणून घेणे गरजेचे राहिल.
सोन्याच्या भावाचा विचार केला तर सोनं 100000 चा पल्ला गाठुन आले आहे.सोन्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अक्षय तृतीय हा महत्वाचा मानला जाणार सण असून या दिवसाचे महत्व पाहता आज सोनं खुपचं स्वस्त झालं.
22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचे दर आपण जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.
सोमवार, २८ एप्रिल २०२५ पर्यंत, चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ₹१,००,८०० इतकी होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत, चांदीच्या किमती किंचित कमी झाल्या आहेत, फक्त १०० रुपयांनी.
दरम्यान, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापारी तणाव आणि कर वादांमुळे सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महाग होत असल्याने, भारतातील किमतीही वाढल्या आहेत.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर परिस्थिती स्थिर झाली तर पुढील सहा महिन्यांत सोने प्रति १० ग्रॅम सुमारे ७५,००० रुपयांना विकले जाऊ शकते. तथापि, जर अमेरिका आणि चीनमधील तणाव आणखी वाढला तर सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम १,३८,००० रुपयांपर्यंत वाढू शकतात.
सोनं आज तब्बल 1000 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पाहावयास मिळाले.
