जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर… गावचा ” पुढारी ” होण्याचं स्वप्न भंगले तर काहींचे रंगले ,,, !
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर उत्सुकता संपली

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि, 21 एप्रिल — सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यावर अनेक मातब्बर नेते व पुढारी याचा हिरमोड झाला आहे तर काहींचे स्वप्न भंगले… तर काहींचे स्वप्न रंगले … गावचा पुढारी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही याची खात्री झाली असून उत्सुकता संपुष्टात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सरपंच पदासाठी 810 ग्रामपंचायतीच्या अनुसूचित क्षेत्रातील 577 अशा एकूण 1.387 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज ( सोमवार ) काढण्यात आली असून सिन्नर तालुक्यात तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत काढण्यात असून तालुक्यातील 114 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत दि, 21 एप्रिल रोजी जाहीर झाले आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण दि, 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणा- या सिन्नर तालुक्यातील जवळपास 114 ग्रामपंचायत साठी सुधारीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित करण्यात आलेल्या सरपंच आरक्षणातून महिलांसाठी ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला सह ) राखून ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी पुरुषांकरीता दिनांक 21 / 4/ 2024 रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय सिन्नर येथे आयोजित करण्यात आली होती तर महिला आरक्षण ( सर्व ग्रामपंचायती ) यांच्याकरिता दिनांक 24 / 4 / 2025 रोजी दुपारी बारा वाजता करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी या वेळी सांगितले निफाड चे प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.अनुसूचित क्षेत्रातील व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्य / नागरिक / स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले सदस्य / पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्यासाठी अहवान या संदर्भात करण्यात आले होते.
आरक्षण सोडत खालील प्रमाणे जाहीर झाली असून यात मनेगाव.अनुसूचित जाती हुतात्मा क्रमांकाने कांदळवाडी. अनुसूचित जाती. मानोरी अनुसूचित जाती. उजनी , आडवाडी.पंचाळे ,सांगवी, डुबेरे ,आदी गावांचा अनुसूचित जाती व तसेच खोपडी बु.. पाथरे बु. , पाडळी. धारणगाव , डुबेरवाडी ( कृष्ण नगर .). दोडी.बु.दातली.खंबाळे. .भरतपुर. कारवाडी. खडांगळी. पांगरी.खु. शहा. देवपूर. दत्तनगर. हे अनुसूचित जमाती तर मागासवर्ग मध्ये पांगरी बु. फुले नगर.वेलु. पांढुर्ली. आगासखिंड . सावतामाळी नगर. केपानगर.चोंडी.सायाळे.मलढोण. कोळगाव माळ.सोनांबे. चंद्र पुर. धुळवाड .वडांगळी. भाटवाडी. जामगाव. .औंढेवाडी. धोंडबार. हिवरे .गुळवंच .निमगाव सिन्नर .हिवरगाव .पाथरे खु.. रामपूर. शिवाजीनगर .दापूर . टेबुरवाडी ( आशापुर. )धोंडविरनगर. ठाणगाव .जोगलटेंभी . हे गाव नामप्र .प्रवर्ग या मध्ये समाविष्ट आहे. सर्वसाधारण वर्गात निर्हाळे. पाट पिंपरी .पाटोळे .पास्ते. पिंपळगाव पिंपळे . फर्दापूर .बारागाव पिंपरी. बोरखंड .ब्राह्मण वाडी. भोकणी. मर्हळ बु. मह्रळ खु. .माळेगाव. . मिठसागरे.मिरगाव .मुसळगाव .मेंढी. मोहो. यशवंत नगर.( पिंपरवाडी. ) रामनगर. ( राम जोशी वाडी ) .वडगाव पिंगळा .वडगाव सिन्नर .वडझिरे. वारेगाव. वावी .विंचू दळवी. शास्त्रीनगर .शिवडे. श्रीरामपूर. सरद वाडी. सुरेगाव .सुळेवाडी. ( सुंदरपुर.) सोनगिरी .सोनारी .सोनेवाडी. सोनठाणे .हरसूले. आदी गावांचा समावेश आहे.
आरक्षण जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत…
— शहा ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले असून ते अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे म्हणून इच्छुकांचे बाशिंग गळून पडले फार वाईट झाले आहे —
____. सामन्य – नागरिक ,,,
—- एवढ्या लवकर आरक्षण जाहीर झाल्यावर सध्या सरपंच म्हणून कार्यरत असलेले विद्यमान सरपंच हे आपला पत्ता कट झाला आहे अशा भावनेने सर्व सामान्य माणसाला महत्त्व देण्याचं टाळलं जाईल.. विकास कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून फक्त टाईमपास करत राहतील. असे मत व्यक्त होत आहे. ….
— मतदार ,,,
