वणी येथे परप्रांतीयांकडून तिघांवर कात्री हल्ला

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी येथे परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
यासंदर्भात वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी वणी येथील बाजार पटांगणा लगत असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमधील परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या काही टेलर यांनी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या पेठ तालुक्यातील तिघांवर आर्थिक व्यवहारातून वादावादी झाल्यामुळे हातातील कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे तर दोघेजण किरकोळ जखमी आहे. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पैकी एकाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी वणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
परप्रांतीयांनी ग्राहकावर कात्रीने केलेल्या हल्ल्यामुळे परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वणी शहरासह तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी चायनीज ची दुकाने, विविध हॉटेल्स व केशकर्तनालयात परप्रांतीय युवक आढळून येतात. सदर परप्रांतीय तरुणांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांच्या नावाची तसेच ओळखीची शहानिशा करणे आवश्यक असून भविष्यात काही गंभीर घटना घडल्यास मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरीही या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशन सह ग्रामपालिकेने देखील लक्ष घालून सदर परप्रांतीय युवकांच्या ओळखपत्रांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
गंभीर जखमी
1)प्रवीण काळु गुबाडे वय 25 राहणार तोंडवळ तालुका पेठ
किरकोळ जखमी
युवराज हनुमंत रानडे वय 21 राणा तोंडवळ तालुका पेठ
हनुमंत गोविंदा राणोळे वय 50 रा.तोडवळ ता पेठ
