प्रहार च्या दिव्यांग सदस्य पेटारे यांच्या उपोषणाला यश … ! अखेर — कोळपेवाडी कारखान्याकडून सर्व मागण्या मान्य,,,
प्रशासनाकडून लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि, 10 एप्रिल — दिव्यांग ग्रामपंचायत सदस्य पेठारे यांच्या उपोषणाला अखेरीस यश मिळाले असुन कर्मवीर सहकारी साखर कारखाना यांनी उपोषणाची दखल घेऊन श्री , पेटारे यांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्यास असुन या संदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग सदस्य पेटारे यांच्या तीन दिवसाच्या उपोषणानंतर अखेर तोडला निघाल्याने उपोषण मागे घेण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री ,आभाळे साहेब . कोपरगाव पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक . ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत लिंबू सरबत घेऊन पेटारे यांचे उपोषण सोडण्यात आले असून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. दरम्यान श्री. पेटारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सुरवातीला सरकारी यंत्रणेने कडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. उपोषण हाणुन पाडण्यासाठी प्रयत्न केला गेला.परंतुश्री, पेटारे यांची जिद्द आणि चिकाटी व आत्मविश्वास लक्षात घेता अखेर साखर कारखान्याच्या प्रशासकीय अधिकारी व संचालक मंडळाने या उपोषणची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या असून त्या प्रकारे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग सदस्य पंकज पेटारे यांनी अखेर आपलं तिन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला -स्थगिती देण्यात आली आहे परंतु ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आपल्या वर उपोषण करण्याची वेळ आली होती त्यामुळे या संदर्भात आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार करण्यात येणार असल्याचे श्री.पेठारे यांनी सांगितले आहे.. या पुढे दिव्यांच्या प्रश्नांसाठी आपला लढा चालूच ठेवणार आहे असे मत स्पष्ट केले आहे .
तालुक्यातील भरतपुर येथील ग्रामपंचायत दिव्यांग सदस्य पंकज पठारे यांनी गेल्या तीन दिवसापासून कर्मवीर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टेरिगेडसमोर उपोषण सुरू केले होते .आजचा त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांचे प्रकृती घालवली असल्याची कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी तपासणी केले असता सांगितले. परंतु कोळपेवाडी सहकारी कारखान्यातील संबंधित अधिकारी यांनी अद्याप उपोषण स्थळी येऊन साधी सहानुभूती सुद्धा दाखवली नाही. अद्याप भेट दिली नसून कोणतीही कार्यवाही केली नाही व दखल सुद्धा घेतली नाही त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे या संदर्भात कारखान्याचे एमडी आभाळे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता ” मी बाहेर आहे .मला यायला उशीर लावू शकतो .मी कधी येईल हे नक्की सांगता येणार नाही. उपोषणा संदर्भात तेथील प्रशासकीय अधिकारी दखल घेतील असे बोलून आपली बाजू झटकून मोकळी झाले व प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळले.कारखान्याच्या मुळीयुक्त पाण्याने परिसरातील सिन्नर तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जवळपास दहा-बारा गावांचा समावेश आहे यामुळे युक्त पाण्यामुळे परिसरातील जमीन नाभिक होण्याची भीती होती तसेच यामुळे युक्त पाणी जमिनीत येऊन ते मुळीयुक्त पाणी विहिरीला येऊ लागल्याने जनावरांची व माणसांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली व आरोग्यास धोकादायक ठरू लागले त्यावेळी लोकमत या दैनिकात भाऊसाहेब हांडोरे व अन्य पत्रकार यांनी आवाज उठवला व कारखान्याला आपली चूक कबूल करून त्यावर वरील तोडगा काढला गेला परंतु या च योजनेत हलगर्जीपणा दिसत आहे. तरी यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.या संपूर्ण प्रकरणात कोसाका चे प्रशासन उशिरा का होईना जागं झालं असुन या संदर्भात दखल घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
या अनुषंगाने तिस वर्षांपूर्वी कारखान्या मार्फत प्रत्येक कुटुंबाला पाण्याचा टॅंक दिला व तो टॅंक कारखान्याच्या टँकर मार्फत पाण्याने भरून दिला जाईल अशी हमी दिली होती .म्हणून त्यापध्तिप्रमाणे अंमलबजावणी केली जात होती. परंतु ते पाणी आठ दिवसांनी येत असल्याने तोपर्यंत पाणी स्वच्छ करता येत नाही ते पाणी तसंच जपून वापरावे लागत असल्याने पाण्यात जीव जंतू तयार होतात व ती पाणी पिण्यालायक राहत नाही आरोग्य धोक्या निर्माण होतो. जानेवारी सुद्धा पीत नाही .या संदर्भात ग्रामपंचायतीने खरी परिस्थिती पाहून .पाण्याचा नमुना घेऊन. प्रत्यक्षात येऊन पंचनामा करावा.व आहे त्या स्थितीचा ठराव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न करत आहे व मागणी करत आहे परंतु ग्रामपंचायत सरपंच . उपसरपंच हे हा ठराव देण्यास नाकार देत असून व जबाबदारी झटकून मोकळे होत आहे या संदर्भात सरपंचांना विचारले असता आमचे कारखान्याशी आर्थिक संबंध असल्याने व आमच्या वाहने कारखान्याकडे असल्याने आम्हाला कारखान्याचे विरुद्ध ठराव देता येत नाही. भले तुम्ही आम्ही सरपंच आहे तोपर्यंत मागू नका आम्ही सरपंच खाली झाल्यानंतर नवीन येणाऱ्या सरपंचा ठराव घेऊ शकतात अशी असे सांगून श्री, पेटारे यांना ठराव देण्याचे नाकारले जात आहे तसेच याला जबाबदार ग्रामसेवक सुद्धा असल्याची श्री , पेटारे यांनी सांगितले ग्रामसेवक कुठलीही काम करण्यास टाळाटाळ करतो. उडवा उडवी ची उत्तरे देतो. ग्रामपंचायत दिव्यांग सदस्यांना अपमानित केल्यासारखे अपशब्द वापरून खिल्ली उडवत असतो. अशा ग्रामसेवकांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.तसेच भरतपुर ग्रामपंचायतीचे
सरपंच .ग्रामसेवक.व सदस्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे व ठराव नाकारल्यामुळे मला शेवटी अखेर कारखान्याच्या गेट समोर उपोषण करण्याची वेळ आली.तरी त्यामुळे मला न्याय देण्यात यावा व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपोषण प्रसंगी श्री पंकज पेटारे यांनी केली होती.. अखेर ——-
अखेर ३ दिवसांनी पंकज यादव पेटारे दिव्यांग अपंग ग्रामपंचायत सदस्य भरतपुर लक्ष्मणपुर ता-सिन्नर जि-नाशिक यांचे सर्व मागण्या पूर्ण करुन कोसाका चे प्रशासन जागे झाले असून या संदर्भात दखल घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे तिन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला सांगता करण्यात आली आहे…
आमरण उपोषण .सोडले .
दि कर्मविर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी .
डिसलरी गेट समोर . चालेल्या आमरण उपोषणा ला अखेर यश .
प्रहार. …..
