शेती

कृषिमंत्री कोकाटे यांच्या घरासमोर मध्यरात्री बच्चू कडू हे स्वतः मशाल आंदोलन करणार …

शेतकरी कर्ज माफी साठी शासनाला जाग येण्यासाठी प्रहार चार दणका


वेगवान नाशिक  / ‌भाऊसाहेब हांडोरे

  1. सिन्नर  :  दि ,  11 एप्रिल 2025  — ‌शेतकऱ्यांच्या कर्जमाफी च्या अनुषंगाने राज्यातील या लबाड सरकारला जाग येण्यासाठी व शेतकऱ्यांची जाणीव लक्षात आणून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने बच्चुभाऊ कडू यांनी मशाल आंदोलन हाती घेतले असून राज्याचे कृषिमंत्री खुद्द माणिकराव कोकाटे यांच्याच घरासमोर निळा दुपट्टा व भगवा झेंडा घेऊन एका हातात मशाल पेटवून कोकाटे यांच्या नाशिक येथील निवासस्थानासमोर क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त साधून मशाल आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे वतीने देण्यात आली आहे
    महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांच्या घरासमोर प्रहार चे कार्यकर्ते मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले .तर या आंदोलनासाठी संघटनेचे जिल्हाप्रमुख शेतकऱ्यांचे कैवारी गणेश निंबाळकर यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यातून हजारो शेतकरी आपापल्या विधानसभा सदस्यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत व तसेच जिल्हाप्रमुख कृषी मंत्री यांच्या घरासमोर हातात मशाल व शेतकर्याना सोबत घेऊन आंदोलन करतील या आंदोलनात खुद्द बच्चू कडू सहभागी होणार असल्याचे खात्री खात्रीलायक वृत्त आहे शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा गाजर दाखवून दिशाभूल करून. फसवून केली व मत मागितले व प्रचंड बहुमताने शेतकरयांनी विश्वास दाखवून या सरकारला सत्तेवर आणले. सत्तेवर येताच या लबाड शासनाला शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफी तर नाहीच उलट . सुलट शेतकऱ्या बद्दल अपशब्द वापरून नेहमीच शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारी सिन्नरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर पैटती मशाल घेऊन असंख्य शेतकऱ्यांच्या साक्षीने आंदोलन करणारा असल्याची माहिती आहे. कारण आम्ही सत्तेत आलो तर तुमचा सातबारा कोरा करू म्हणजेच तुम्हाला कर्जमाफी करू असं ठोस आश्वासन देण्यात आलं परंतु शंभर दिवस होऊनही सरकारने अद्याप शेतकऱ्यांचा कुठलाही सातबारा कोरा झालेला नाही. या मागणीला धरून माननीय शेतकऱ्यांचे नेतृत्व ओम प्रकाश बच्चू कडू हे 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी सायंकाळी रात्री बारा वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेचे आमदारांच्या घरासमोर मशाल  पेटवून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे व याचाच भाग म्हणून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक येथील निवासस्थानी स्वतः बच्चू कडू यांच्या उपस्थितीत तमाम शेतकऱ्यांच्या साक्षीने मशाल आंदोलन करण्याचा व या माध्यमातून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!