या ग्रामपंचायत च्या इतिहासात प्रथमच दिव्यांग महिलेला सरपंच पदाचा न्याय
या ग्रामपंचायत च्या इतिहासात प्रथमच दिव्यांग महिलेला सरपंच पदाचा न्याय

वेगवान नाशिक/एकनाथ भालेराव
नाशिक /दिनांक: 9 एप्रिल/
येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रंजना पठारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली रंजना पठारे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
सायगाव ग्राम पंचायतीच्या सरपंच शालिनी कुळधर यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्राम पंचायत सायगाव कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी रंजना पठारे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रंजना पठारे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी ग्रामपंचायत सायगाव ग्रामसेवक,आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत पठारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रंजना पठारे यांनी दिली आहे
पोलिओ मुळे अपंगत्व आलेली ३०-३२ वर्षाची तरूणी रंजना पठारे गावाचे सरपंच पद सांभाळयाला सज्ज झाली आहे आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात कायापालट घडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे,
सायगाव ग्रामपंचायतीचे येवला तालुक्यातील पहिल्या दिव्यांग महिला सरपंच रंजना पठारे यांची नावांची चर्चा सध्या तालुक्यातील नागरिकांनामध्ये होत आहे. कारण अपंगत्वावर मात करत गावचा गाडा ओढन्यासाठि गावचे सरपंच म्हणून सज्ज झाली आहे यामुळे पठारे यांचे कौतुक होत आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये