सेवा निवृत्त शिक्षिकास तब्बल …रू , 24 लाखांचा गंडा — !
सायबर क्राईम च्या आँनलाईन व्यवाहर पडला महागात

वेगवान नाशिक / मारूती जगधाने
सेवानिवृत्त शिक्षकास २४ लाखाचा गंडा
नाशिक : दि, 8 एप्रिल — सायबर क्राईम सातत्याने होत आहे ऑनलाइन व्यवहार झाल्यामुळे भामटे नागरिकांना लुबाडत असल्याचे अनेक घटना ओपन झालेले आहे त्या घटनांची पोलिसात नोंद देखील आहे याबाबत संरक्षण विभागाने ग्रह खात्याने असे कोणी कॉल तुम्हाला करत असेल आणि तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल तर तो सायबर क्राईम आहे याबाबत तात्काळ पोलिसांना संपर्क करावा असे जागृत करणारे दैनंदिन फोन प्रत्येकाच्या कानावर पडत असतानाही नांदगाव शहरात असाच एक प्रकार घडला आहे.
तुमच्या खात्यावर मनी लॉन्ड्रिंग ची रक्कम जमा झाल्याचा संशय असून, एक मनी लॉन्ड्रींगच्या केस मध्ये तुमचे एटीएम कार्ड सापडले आहे.
त्या एटीएम कार्डच्या खात्यावर ६८ लाख रुपये जमा आहे. ही ६८ लाख रुपये तुमच्या खात्यावर कशी जमा झाली आहे.याची चौकशी करायची असून असा बनाव करून नांदगाव येथील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकास २४ लाख १० हजार रुपयाचा ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.
आपली फसवणूक झाली असल्याचे सेवानिवृत्त मुख्यध्यापकास लक्षात येताच मुख्याध्यापकांनी नांदगाव पोलीस स्टेशन गाठत झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली असून शिक्षकांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की नांदगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापू धनाजी बोरसे हे आपल्या कुटुंबासमवेत नांदगाव येथे स्थायिक आहे. २४ फेब्रुवारी त्यांना एक कॉल आला. समोरची व्यक्ती हिंदी बोलत होती. या फोन कॉल द्वारे मुख्याध्यापक यांना सांगण्यातआले की, आम्ही नरेश गोयल यांच्या फ्रॉड केस मध्ये धाड टाकली असून त्या मध्ये तुमचे कॅनरा बँकेचे एटीएम सापडले असून त्यावरती ६८ लाख जमा आहेत तर ते ६८लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये कशी आली आणि ही रक्कम कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याचे आम्हाला चौकशी करायची आहे.
यावेळी मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले की सदर रक्कम सेवानिवृत्तीची ग्रॅज्युएटी, पेन्शन, विक्री भविष्य निर्वाह निधी याची असून यातील काही रक्कम मी माझ्या वैयक्तिक आणि कुटुंबाच्या कामासाठी खरचवली देखील आहे. आणि मी आयकर देखील भरतो.
मुख्याध्यापक यांनी असे सांगताच आम्हाला फक्त चौकशी करायची असून मी तुम्हाला व्हाट्सअप वरती हाय पाठवतो तुम्ही तुमच्या बँकेची स्टेटमेंट त्यावरती पाठवा मुख्याध्यापकांनी त्यांचे बँकेचे स्टेटमेंट त्यांना पाठवले असता. परत काही तासांनी मुख्याध्यापक यांना व्हाट्सअप वरून व्हिडिओ कॉल आला. या व्हिडिओकॉन मध्ये मुख्याध्यापकांना कुलाबा नाव असलेले पोलीस स्टेशन दाखवण्यात आले. पोलीस अधिकारी व्यक्ती युनिफॉर्म मध्ये दाखवण्यात आली.
मुख्याध्यापक यांना या व्हिडिओ कॉल दरम्यान सांगण्यात आले की तुमच्या स्टेटमेंट पासबुकची चौकशी केली असून तुमच्या खात्यावर असलेली रक्कम त्याची आम्हाला चौकशी करायची आहे. तरी तुमच्या खात्यावरील रक्कम तुम्ही आरटीजीएस द्वारे आम्हाला पाठवा आम्ही त्याची चौकशी करून तुम्हाला ती परत करू आणि ही माहिती गोपनीय असून याबद्दल तुमच्या घरच्यांना आणि कोणालाही सांगू नका. मुख्याध्यापक यांनी रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवण्याचा नाकार दिला असता. त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली.
मुख्याध्यापक यांना आरबीआय च्या नावाने एक इंग्रजी भाषेतील पीडीएफ नोटीस पाठवण्यात आली. त्यावरती बराच दस्तऐवज लिहिलेला होता आणि मुख्याध्यापक यांना सांगण्यात आले यावरती आरबीआयचा खाते क्रमांक असून त्यावरती लिहिलेली रक्कम आरटीजीएस करा नाहीतर तुम्हाला अटक करण्यात येईल असा दम देण्यात आला.
अटक होण्याच्या भीतीपोटी मोबाईल धारकाने सांगितलेल्या खात्यावर मुख्याध्यापक यांनी क्रमाक्रमाने २४ लाख १० हजार इतकी रक्कम विविध खात्यांवरती पाठवली.
आता चौकशी पूर्ण झाली असेल तर माझी रक्कम आता परत करा अशी मागणी मुख्याध्यापक यांनी सुरू केले असता रक्कम परत न करता अजून रकमेची मागणी करण्यात येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुख्याध्यापक बोरसे यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी तात्काळ सायबर विभागाला तक्रार केली असता. संबंधित घटनेबद्दल मुख्याध्यापकाकडून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये देखील तक्रार देण्यात आली.
सदर घटनेचा आम्ही गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. ऑनलाइन फ्रॉडला बळी पडू नका असा काही प्रकार घडल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधा. कोणतीही माहिती लपवून ठेवू नका.
प्रीतम चौधरी
पोलीस निरीक्षक
